आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ
दापोली:महिला मंडळ गोल्ड व्हॅली दापोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ गोल्ड व्हॅली दापोलीत मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा व स्त्री एकता शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हळदी-कुंकू समारंभाची सुरुवात सायंकाळी ठीक 4 वाजता करण्यात आली.सर्व प्रथम कुमारी मायरा दळवी या बालिकेला उपस्थित सर्व महिलांनी ओवाळले.त्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींना गोल्ड व्हॅलीतील महिलांनी हळदी-कुंकू लावत ओवाळले व सौभाग्यवतींनी पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना करत परिवाराच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली व एकमेकींना हळदी-कुंकू च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलेल्या सर्व महिलांना प्रसाद व आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.
या समारंभात पिंगला पावरा, पुजा कांबळे,रेवा झगडे, अल्का जळणे,अर्चना दळवी, कविता घाडीगावकर, सारा मोरे,पूजा राठोड, संगीता राठोड, पुजा गुजराती,कल्पना गुरव, रिमा साळवी, संजीवनी साळवी,शिल्पा पाटोळे इत्यादी गोल्ड व्हॅलीतील महिला भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमात परी पावरा,सायमी मोरे,प्रणाली जळणे, सोनी मोरे,निशा पावरा ,समिता महाडिक या मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवला.आदिवासी साडी,मराठा साडी पेहराव महिलांनी केला होता व आकर्षक सोने व चांदीचे दागिने परिधान केले होते.समारंभात विविध समाजातील महिलांनी आपल्या पेहरावाद्वारे आपल्या समाजाच्या संस्कृतीची ओळख करून दिली. सर्व समाजातील महिला समारंभात सहभागी झाल्या होत्या .
दापोली नगरपंचायतच्या नूतन नगरसेविका साधना बोत्रे यांचे गोल्ड व्हॅलीतील महिला भगिनींनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व सत्कार केला. नगरसेविका साधना बोत्रे यांनी सुद्धा हळदी-कुंकू कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व गोल्ड व्हॅलीतील आयोजक महिला मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.
समारंभात महिला भगिनींनी ग्रूप फोटो काढलेत. एकमेकांची ओळख करून देण्यात आली.त्यानंतर 'माय भवानी' या गाण्यावर हॅलन पावरा हिने नृत्य सादर केले.'स्वामी स्वामी' या प्रसिद्ध तेलगू गाण्यावर प्रणाली जळणे व सायमी मोरे यांनी छान नृत्य केले. आई तुझं देऊळ या गाण्यावर निशा मोरे हिनेसुद्धा नृत्य सादर केले व शेवटी सर्व महिलांनी सुद्धा मराठी गाण्यांवर बिनधास्त आपला नाच दाखवला.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार