एकलव्य संघटनेचा ( Eklavya Sanghatana ) राज्यव्यापी संपर्क अभियान दौऱ्याचा समारोप औरंगाबाद येथे संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )

औरंगाबाद:- दिनांक : २१/०२/२०२२ वार सोमवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष श्री.सुधाकरराव वाघ साहेब तसेच प्रदेश सचिव मा.श्री.मधुकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठकीचे समारोप संपन्न करण्यात आले. 




एकलव्य संघटनेचा संपर्क अभियान दौरा दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासून बुलढाणा जिल्ह्यातून सुरुवात होऊन जालना, बीड, अहमदनगर व औरंगाबाद असे एकूण पाच जिल्ह्यातील जिल्हा बैठका ह्या संपर्क अभियान दौरा निमित्त घेण्यात आल्या.




या संपर्क दौऱ्यात सर्व जिल्ह्यातील भिल समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला औरंगाबाद येथे संपर्क अभियान समारोह मध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच एकलव्य संघटना मराठवाडा अध्यक्ष श्री.रमेश शिंदे साहेब, मराठवाडा उपाध्यक्ष श्री.नितेश बर्डे, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष श्री. नंदूभाऊ पवार, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल ठाकरे, जालना जिल्हाध्यक्ष श्री.आत्माराम गायकवाड, जळगांव रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री.निवृत्ती पवार, औरंगाबाद जिल्हा सचिव श्री. परशुराम सोनवणे, जळगांव लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पिंटूभाऊ गायकवाड, जालना युवा जिल्हाध्यक्ष श्री.भारत बर्डे, भिकन पवार, उमेश सोनवणे  व आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



Post a Comment

0 Comments

झाले