नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा साकोलीच्या वतीने शिव जयंती निमित्त सहानगडावर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ, सदस्य. 

साकोली (दि.19/02/2022)

           भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या जवळच असलेल्या सहानगड किल्ल्यावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता संस्था शाखा साकोली व एक पाऊल सानगडीसाठी...यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.सोबतच किल्ला परिसराची  स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले.

          



सर्व प्रथम नेफडो व एक पाऊल सानगडीसाठी या टीमने संपूर्ण सहानगड किल्ला परिसर स्वच्छ केला.सोबतच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.नागपूर विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नेफडो चे विभागीय सचिव घनश्याम निखाडे म्हणाले सहानगड  किल्याचे संवर्धन  सानगडी वासियांनी केले पाहिजे.तसेच नेफडो चे भंडारा जिल्हाअध्यक्ष  प्रा.खेमराज राऊत यांनी नेफडो राबवित असलेल्या उपक्रमाबाबद  माहिती दिली.तसेच शिवरायांचे पर्यावरणीय कार्य व जलव्यवस्थापन याविषयी नेफडो पदाधिकारी यांनी  मार्गदर्शन केले.

          



कार्यक्रमाचे संचालन से.नि.केंद्रप्रमुख सविता उप्रीकर तर आभार नेफडो भंडारा सहसचिव भाऊदास मेश्राम यांनी केले.यावेळी नेफडो चे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रदिपकुमार सोमवंशी ,नेफडो चे साकोली तालुका  उपाध्यक्ष गेंदलाल इंदूरकर ,साकोलीच्या महिला अध्यक्षा कल्पना सांगोडे ,संघटक वंदना नंदेश्वर ,प्रा.धवनकुमार करेले,एक पाऊल सानगडीसाठी चे कार्यकर्ते अजय निपाने,उमेश भांडारकर ,नितिन चंद्रवंशी ,निखिल देवरे,सोपान फरांडे आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

झाले