आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
कछारगढावर महापुजा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी एस.जी. उईके सर बिरसा फायटर्स विदर्भ महानिरिक्षक यांचे तर्फे संपन्न
केंद्रिय राज्य मंत्री मा. फग्गनसिंह कुलस्ते यांचे संघटनांचे विशेष प्रतिनिधी मंडळ उपस्थीत
एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार राज्य सदस्य
गोंदिया /सालेकसा /धनेगांव (१८ फेब्रुवारी):- कोप्पागढ हे स्थान निसर्ग निर्मित ग्राम धनेगांव पायथ्यापासून १० कि.मी. अंतरावर पहाडस्थीत पाण्याच्या तटावर झरा आहे. तिथे गोटुल संस्कार केंद्र तयार करून पहांदी कुपार लिंगो व रायतोर जंगो माता रहायची. जम्माकुडो निलकोडा पर्वतावर गोटुल आश्रमात कली कंकालीचे ३३ मुले शंभु शेकने बंद केली असल्याचे माहिती आहे ह्या जागेवर प्रत्येक वर्षी गोंगो देव मडई ( हिंदी) महापूजा साजरी केली जात असते.
लोक कथामध्ये लिंगोचा जन्म पहांदी वृक्षाच्या फुलामध्ये झाला असे म्हणतात. वादळ वाऱ्यात या शालमल काटसावरी वृक्ष फुलांच्या गुच्छातून निर्माण झालेला जिवंत पुंज चांदीचे शरिर तेजस्वी बालकास जसा चमकत होता. म्हणुन त्या रुपोलंग (गोंडी) नाव देण्यात आले.
ज्या पहांदी वृक्षाच्या फुल गुच्छातून जन्म झाल्याने त्याचे नाव पहांदी पारी कुपार सुध्दा म्हणतात. शालमल वृक्षास देववृक्ष सुध्दा म्हटले जाते. अशी आख्यायिका आहे.
या प्राचिन गुफाचे संबंधी इंग्रजी लेखक राईट रेव्हरेंट, व इयरी चेटरटन, डी डी यांनी सतराव्या शताब्दीम्ध्ये द स्टोरी ऑफ गोंडवाणा या ग्रंथात कचारगढ गुफा व लिंगोच्या बाबतीत लिखान केले आहे. यात लोकसाहित्य रेणागीत, कहाणी, मिथक कथा, आधारावर लिंगोच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे. असे आदिवासी समुहाचे भारतवर्षातून महाराष्ट्र,मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडीसा, बिहार, झारखंड या राज्यात दरवर्षी दि.१४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी माघ महिन्यात मोठी सांस्कृतिक व धार्मिक जत्रा भरते.
या आदिवासी समाजाच्या आस्था, अस्तित्व, आत्मसंम्मानार्थ व स्वाभिमानासाठी व महागोंगोची हजारो भाविकांच्या वर्दळीत ढोल दिरबुडी, सनई वाद्यांच्या सप्त सुर नादात संगीतात डुबून नाचत गात रॅलीने सप्तरंगी पताका आसमंतात घुमवत व ध्वजपुजन भुमकांचे वतीने पुजा केली जातो.
याचे श्रेय समाजातर्फे साहित्यिक उषाताई आत्राम, स्वर्गिय:- गोंडी भाषाचार्य सुरेंद्रसिंग ताराम, लिपी संशोधक मोतीरावन कंगाली यांना जाते. यांचे मॄत्युनंतर सामाजिक संस्था व सरकारने दायित्व उचलून कार्य हाताळत आहेत. कालयानिमित्य विकसीत आदिवासी कचारगढ धनेगांव ) स्मॄर्तीस्थाळावर आमदार खासदार व मंत्री महोदय हाजेरी लावतात.
याप्रसंगी बिरसा फायटर्स विदर्भाचे वतीने एस जी उईके सर (मा.कॄषी अधिकारी बिरसा फायटर्स), मा.सहषराम कोरोटे उपाध्यक्ष तथा आमदार आमगांव (देवरी) विधानसभा मा.जितेंद्र वल्के, युवा प्रतिनिधी, केंदीय मंञी फग्गनसिंह कुलस्ते, मा आमदार संजय पुराम पुराडा, डाॅ. प्रकाश वट्टी सर, नेवजाबाई महाविद्यालय ब्रम्हपुरी, व लाखोच्या संख्येने भाविक व समाज बांधव उपस्थित होते. सर्व कार्य कचारगढ ट्रष्टी समितीचे वतीने उर्वरित धार्मिक कार्य सुरू राहते.
जय जोहार । जय आदिवासी ।
गोंडी संस्कॄती जिंदाबाद! जिंदाबाद!! एक तीर एक कमान सभी आदिवासी एक समान।
गोंडी संस्कृति को मेरा नमन !
जय गोंडवाणा
जय पृथक विदर्भ
वॄत संकलन व समाजसेवक
निर्मलकुमार पंधरे
संपर्क :- 9404283750

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार