आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
पं स सदस्या कांचन वरठे यांचे हस्ते गुंथारा, वाघबोडी, पुरकाबोडीटेकेपार, राजेगावखुर्शीपार गावी खावटी किट वाटप
एसके.जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व पञकार राज्य सदस्य
भंडारा:-(२६ फेब्रुवारी.) तालुक्यातील गुंथारा क्षेत्रा अंतर्गत विविध गावी आदिवासी विकास विभागा अंतर्गत पुरकाबोडी, खुर्शीपार, गुथारा, राजेगांव, वाघबोडी, गावात खावटी १००% अनुदान किट वाटप करण्यात आले.
सन २०१९-२०२० कोविड 19 अंतर्गत मनरेगा मजूर यात अपंग, भुमिहीन, बेरोजगार यांना सहाय्यता म्हणुन वस्तुरुपाने २००० रूपयाचे जीवनावश्यक वस्तु लाभार्थ्यांचे खात्यात सरळ २००० रू. देण्याचे ठरले होते व सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स, विदर्भ यांचेशी मा.निरज मोरे प्रकल्प अधिकारी भंडारा यांच्याशी चर्चा घडवून आली. विविध आदिवासी संघटनांचे वतीने यात सुटलेल्या उर्वरित कुटुंबीयाना निवेदने व अर्जाद्वारे चर्चा, मागणी करण्यात आली नंतर सर्वे करून नव्याने किट मिळण्याचे नियोजन सरकार स्तरावर झाले व नंतर वाटप केले.
जिल्हा भंडारा साकोली मध्ये एका कार्यक्रमात मालुटोला येथे मा.नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमेटी महाराष्ट्र यांनी सर्वे करून आदिवासी परिवारांना किट वाटप करण्यात यावे असे ताकीद देत आदेश दिले. यात अंत्योदयात कोणताही गरिब कुटूंब योजनेतून सुटू नये म्हणुन दि.१७ फेब्रु.प्र.अधिकाऱी भंडारा यांचे पञ.चे अनुसंघाने २१,२२ फेब्रुवारी पासून वाटप सुरू आहे.
या अन्न धान्य वाटपावेळी प्रत्यक्ष पं स सदस्य कांचन वरठे यांचे हस्ते संबंधित गावी वाटप केले. त्यावेळी अन्य कोनतीही योजना आपणापर्यत लोकप्रतिनिधी या नात्याने दारापर्यंत आपण पोहचवू असे सौ.कांचन होमदास वरठेनीं लाभार्थ्यांना सांगितले त्या वाटपा- वेळी शिक्षक, करवाडे, साखरे, सर, विश्वनाथ चाचेरे, हुकरे सर, व किशोर मस्के, होमदास वरठे ता. अध्यक्ष, बिरसा फायटर्स भंडारा संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार