आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत पल्स पोलिओ कार्यक्रम वडेगांव येथे संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी राज्य पत्रकार सदस्य

साकोली/भंडारा:(२७) वडेगांव येथे अंगणवाडी केंद्र व शंकरपुर येथे ० ते ०५ व पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यावेळी समन्वयक सुरेशकुमार पंधरे उपसरपंच मा.समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांच्या हस्ते पल्स पोलीओ बालकांना डोस पाजण्यात आले. 


सकाळी ७ :३० वाजेपासून सुरवात झाली. यावेळी पल्स पोलियो केंद्रावर स्वंय सुरेशकुमार पंधरे प्रमुख उपस्थीत होते तसेच कोकिला मेश्राम, अंगणवाडी सेविका, मनिषा पंधरे ( ASHA) आशा स्वंयसेविका हजर होत्या. 




युनिसेफने भयंकर रोगांना हरविण्यासाठी उच्चतम प्रतिबंधीत उपाय योजना म्हणुन दोन थेंब जीवनाचे द्यावे. नव्या उमेदीकरिता आधुनिक पिढीजात बालकांना वाचवा व अंपंगत्वापासून संरक्षण द्यावे. "प्रिव्हंशन इज दी बेटर दॅन क्युर " हा मस्त उपाय आहे असे सुचविले. भारत पोलियो मुक्त आहे. काही देशात पोलियो अद्याप असल्याने तो पुन्हा परत पुढे परत येवू नये. म्हणुन भारत देशवासिय बालकबालिकांच्या संपुर्ण सुरक्षिततेची खबरदारी / जिम्मेदारी घेण्याचे काम स्वातंत्र्य काळापासून सरकार घेत आहे. 




पोलिओवर मात करण्यासाठी सक्षम निरोगी मानव निर्मितीसाठी पल्स पोलिओ हाच निर्भय उपाय आहे असे सुरेशकुमार पंधरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

झाले