अजंग ता जि धुळे येथील मा श्री सरपंच भैया भाऊ पाटील यांच्या प्रयत्नामुळे जळालेले डी.पी. ट्रान्सफॉर्मर एका दिवसात नवीन ट्रांसफार्मर ऊपलब्ध करून दिले....

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ


धुळे:- अजंग ता जि धुळे येथील शेतकरी यांनी अंबोडे गाव  रस्त्यालगत शिव जवळील डीपी ट्रांसफार्मर दि ०२/०२/२०२२ रोजी जळाली असल्याकारणाने अजंग गावाचे मा. श्री. सरपंच भैया भाऊ पाटील यांना फोन करून सदर ट्रांसफार्मर बाबत माहिती दिली भैया भाऊ पाटील यांनी तत्काल मा.श्री.राजेंद्र जी चितोडकर साहेब यांना भेटून एकाच दिवसात ट्रांसफार्मर मिळवून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यात यशस्वी झाले.  


मा श्री सरपंच भैया भाऊ पाटील 


राजेंद्र चीतोडकर साहेब व भैया भाऊ पाटील यांच्या  प्रयत्नांमुळे अजंग ता जि धुळे येथे एक दिवसात नवीन डी.पी. ट्रांसफार्मर ऊपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मुन्ना ताराचंद पाटील, हिरालाल तुळशीराम पाटील, रावण सखाराम देवरे, नामदेव परशुराम भदाणे, युवराज नथू पाटील, धर्मराज साधू पाटील, कैलास विश्राम पाटील, संजय गंगाराम माळी, चुनीलाल गंगाराम माळी यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानले. 



  

Post a Comment

0 Comments

झाले