आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ रा.विश्व.पञकार संघ राज्य सदस्य
वरिष्ठ पत्रकार अशोक गुप्ता यांची उपस्थिती
साकोली:- डी. जी. रंगारी हे लाल बहादूर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गोंडउमरी येथे गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत होते त्यांना 33 वर्ष सेवा दिली या शिक्षकी पेशाच्या काळात सुद्धा त्यांनी आपला पत्रकारीतेच्या छंद जोपासला, अंधश्रद्धा निर्मूलन सारखे प्रबोधन कार्यक्रम घेतले, आणि विविध प्रबोधन कार्यक्रम घेतले पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गेल्या पंचवीस वर्षांपासून अव्याहत करत आहेत.
म्हणून त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले ते 31 जानेवारीला सेवानिवृत्त झाल्यामुळे साकोली तालुका पत्रकार संघातर्फे त्यांच्या शाल, स्मृतिचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन रंगारी क्लिनिकल लॅबोरेटरी या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, रमेश दृककर, संजय साठवणे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस, नाजिम पठाण, सुनील जगिया, प्रशांत शिवणकर, संतोष कोरे, शाहेद कुरेशी इत्यादी पत्रकार मंडळी सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
त्यांनी भविष्यामध्ये पत्रकारितेचा आणखी बळकट करावी असे मत मांडले व डी जी रंगारी यांना पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार