जिल्हाधिकारी कार्यालयात डी जी रंगारी यांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार राज्य सदस्य

भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई तर्फे राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार, पत्रकार पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, सोहळा भंडारा जिल्ह्याच्या वतीने भंडारा जिल्हा कार्यालयात आज आयोजित करण्यात आला होता.




या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी  निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून  श्रीपती मोरे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना भंडारा यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे यांच्या उपस्थितीत डी जी  रंगारी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपजिल्हाधिकारी येथील प्रशासकीय मंडळी व महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले