कारच्या जोरदार धडकेत वडेगांव सर्रा गायखोरी नाल्याजवळ रस्त्यावर अपघात तीन जण जागीच ठार...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com




एसके जी पंधरे :राज्य पञकार प्रतिनिधी 

तिरोडा:-  लेखी फिर्याद कर्ता जितेश संपत आहाके वय ३४ वर्ष रा. कोडेबर्रा पो. सुकडी यांचे तक्रारीचे अनुसंघाने क्रिटा व्हाईट कलर कार क्र . MH35. AN -2121 चा चालक चिंतामन रहागडाले रा. खैरबोडी बेधडक व लापरवाहीने हिरो होंडा वाहन क्र. MH 35 AL-4729 वर जात असलेल्या दोन इसमांना कारने जोरदार धडक देवून मृत्युस कारणीभूत ठरला. 




या अपघातात संपत ठुरी आहाके वय ६५, प्रताप संपत आहाके वय ३६, कोडेबर्रा, तर हिरदेसिंग आसाराम टेकाम वय ७० रा मंगेझरी यांना कार चालक चिंतामन रहांगडाले यांनी त्यांचे ताब्यातील क्रेटाकार ने धडक देत अपघात घडवून आणला असल्याचे तक्रारीचे नमुद एफ आय आर मध्ये प्रथम दर्शनी म्हटले आहे. 


घटना अशी की, आज मृतकासह तिघेजन कोडेबर्राहून लग्नाची तारीख काढण्यासाठी कोडेलोहारा येथे गेले होते. व परत येत असतांना सर्रा जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या जोरदार धडकीत श्री.संपत आहाके व हिरदेसिंग टेकाम जागीच ठार झाले तर यात भाऊ प्रताप संपत आहाके हे जिल्हा रूग्नालयात उपचारास नेतांनी मरण पावल्याचे गणेश बाणाजी भुत यांनी बातमी सांगितल्याचे वॄत हाती आले.


यामुळे पोलीस स्टेशन तिरोडा येथे आरोपी कारचालक चिंतामन रहांगडाले यांचेवर कायदेशीर कार्यवाही लेखी दाद मागण्यात आली. 


यात आरोपीवर भा दं वि १८६० अंतर्गत, कलम,२७९,३०४(A), ३३७, ३३८, व महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये 184 व 134 A गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष बाब  म्हणजे चिंतामन रहांगडाले हे तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत मृतकांना पोष्ट मार्टमसाठी नेण्यात आले असून आरोपीवर कार्यवाही व्हावी हिच बिरसा फायटर्सच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

झाले