आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार
यवतमाळ:- बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील जगद्गुरु संत सेवालाल महाराज जयंतीदिनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली.यावेळी जगदंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन संत सेवालाल महाराज मंदिराकडे जाताना गावातून नगर परिक्रमा करून,पालखी मंदिराजवळ येताच, बंजारा गीतावर नाना पटोले व आमदार अमित झनक सुनील महाराज,बलदेव महाराज यांना ठेका धरण्याचा मोह आवरता आले नाही. त्यानंतर, बंजारा धर्मगुरू संत डॉ.रामरावबापू महाराज समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पटोले यांनी पूजाविधी केली नगारा वाजविला.
यावेळी महंत संजय महाराज, बलदेव महाराज, राजाराम महाराज, टी.आर. राठोड, राहुल महाराज,गदर महाराज, धीरज महाराज, किसान काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार माजी आमदार विजय खडसे माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र हेंडवे,हेमंतकुमार कांबळे,प्रा. विठ्ठल आडे, नवीन राठोड, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सेवालाल महाराज जयंती निमित्त सेवालाल महाराज, जगदंबादेवी, बंजारा धर्मगुरु संत डॉ रामरावबापू महाराज व बाबनलाल महाराज चरणी माथा टेकण्यासाठी सोमवारी आले होते. प्रदेश अध्यक्ष झाल्याबरोबर येथे आलो होतो; मात्र पावसामुळे मंदिरात येऊ शकलो नाही. त्यामुळे जयंती निमित्त येथे आलो असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी संस्थानच्यावतीने कबिरदास महाराज तसेच बलदेव महाराज, संजय महाराज, सुभाष महाराज, नेहरू महाराज यांनीही शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच संस्थान येथे पाळणा गीत सुरू असताना टाळ वाजविले तसेच नाना पटोले यांनी प्रसादाचा लाभ घेतला.हरहन्नरी लोकप्रतिनिधी, सर्वगुणसंपन्न असल्यामुळे भाविकांत पटोले यांच्या बद्दल चांगलीच चर्चा रंगली होती.
भारत देश जगातील सर्वात बलशाली देश बनावा संत सेवालाल महाराज,संत रामराव महाराज यांचे वचन ! नाना पटोले
प्रसारमाध्यमांना संबोधताना नाना पटोले म्हणाले की शक्ती पिठावर आशीर्वाद घेणे संस्कृतीची व देशाची परंपरा आहे. आज मुद्दामुन मी येथे आलो.आज रोज आमचे देशासाठी युद्ध सुरू आहे.देश वाचविण्याचा संविधान वाचविण्याचे युद्ध सुरू आहे.त्यामध्ये यश मिळावं यासाठी मी ईथे आलो. युद्धामध्ये संतांचे आशीर्वाद महत्त्वाचा असतो.शिवाजी महाराज यांच्या पाठीशी सुद्धा संतांचा आशीर्वाद होता.आमचा भारत देश जगातील सर्वात बलशाली देश बनावा संत सेवालाल महाराज,संत रामराव महाराज यांचे वचन होते.ते पूर्ण करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो तसेच देशातील विखारी व मनुवादी व्यवस्थेला उध्वस्त करण्यासाठी व हिंदुस्थानला जगातील सर्वात शक्तिशाली देश व्हावा. सर्वांचे जीवन सुखमय आनंदी व्हावे अशी भुमिका संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रार्थना करतो. तसेच मनुवादी व्यवस्थेचा संवाद व्हावा ही भूमिका आमची आहे.
स्त्री शक्ती देशातील सर्वात मोठी शक्ती आहे.मात्र आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एका आईचा अपमान केला स्त्री शक्ती व देश देशातील सर्वात मोठी शक्ती स्थळ म्हणून या शक्तीस्थळ आशीर्वाद घेण्यासाठी तसेच शेतकरी बेरोजगार शेतमजूर गरीब या सर्वांचा प्रश्न निर्माण झाला आहे ते कसं चांगला करता येईल यासाठी मी ते आज आशीर्वाद घेण्यासाठी आलो असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली. पालखी सोहळा आठ तास चालला. त्यानंतर पालखी मंदिरात पोहोचली. यावेळी सेवालाल महाराज पालखी सोहळ्यात भाग घेऊन त्यांनी 'सेवालाल बापुरी डोली आदर चाल' या गाण्यावर ठेका धरला. राजुदास महाराज, प्रा. जगदीश राठोड यांनी पाळणा गीत सादर केले संस्थानचे अध्यक्ष महंत कबिरदास महाराज यांनी बापूची आरती म्हटल्यावर भोग (भंडारा) अर्पण करून आरदास करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे जानुसिंग महाराज, मधुकर राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा. उल्हास महाराज, खुशाल महाराज जगदीश राठोड कंडलिक राठोड यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार