आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तर्फे भंडारा तालुक्यातील खावटी वाटप करण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांचे पत्र

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





एसके जी पंधरे -विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व.पञकार राज्य सदस्य

भंडारा (१८ फेब्रुवारी ):- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्पाचे दि १७/०२/२२ चे क्रमांक खावटी २०२०/प्र/क्र/का./३(९)/477 संदर्भीय पत्रानुसार उपरोक्त सरनामा अन्वये राज्यात उद्भवलेल्या कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांनी सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना 1 वर्षासाठी सुरू करण्या बाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागाने अनुसूचित जमाती परिवारास ४०००-/रू.अनुदान किंमतीचे वस्तु व २०००-/- रू इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येत आहे. 


भंडारा तालुका समन्वयका मार्फत किट वाटपाची लाभार्थी कुटूंबा पर्यंत गावनिहाय वाटप व सोबत फोटो सबब कार्यालयात परत पाठवावे असे आदेश पारित केले आहे. मा.निरज मोरे प्रकल्प अधिकारी भंडारा यांनी नुकतेच पत्र प्रसिध्दी करिता जारी केले आहे. 


जिल्हा संघटनेच्या वतीने तालुका पदाधिकारी व तेथील ग्राम शाखा व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वाटपाची अमंलबजावणी करावी असे आवाहन सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ यांनी सुध्दा केले आहे.



Post a Comment

0 Comments

झाले