आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
सतिष भाऊ मगरे मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी
आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राजगृहात माता रमाईना अभिवादन केले.
पोटची पोरं गमवूनही कोट्यवधींची आई झाली ती माता रमाई. गरिबीमुळे येणाऱ्या असंख्य संकटांना स्वतः हिमतीने तोंड दिले परंतु कधी बाबासाहेबांच्या कार्याआड येऊ दिले नाही. सांसारिक दुःख पचवूनही बाबासाहेबांच्या चळवळीत त्या सक्रिय राहिल्या.
कित्येक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेबांच्या संसाराच गाडा ओढताना तुमच्या आमच्यासारख्या कोट्यवधी भारतीयांचे संसार फुलवणार्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार