नांदलपार/लोणारा येथे वीर बिरसा मुंडा क्रिडा मडंळाच्या वतीने एक दिवसीय कबड्डी सामने संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एसके जी. पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

तिरोडा(२६) शक्तीचे आद्यदैवत बजरंग बली व वीर बिरसा मुंडा क्रिडा मंडळाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय  कबड्डी स्पर्धा नांदलपारच्या भव्य पटांगणात आयोजित केले होते. 


शामरावजी उईके महासचिव बिरसा फायटर्स विदर्भ तर उद्घाटक तुमेश्ररी बघेले सदस्या जि. प. सदस्या यांचे हस्ते पार पडले. 


मान्यवर यांचे कडून 

प्रथम ११,१११,रू 1 ला बक्षिस शामराव जी उईके(मा.कॄ.अधि.) महासचिव विदर्भ  

द्वितीय बक्षिस ५,५५५-/- रू. (शिवकुमार तुमसरे, खैरी रविचंद शेंडे लोणारा ) 

तृतीय बक्षिस ३,३३३ -/-रू  मुन्नाजी सलामे, जि.सल्लागार बिरसा फायटर्स गोंदिया, कोमल सयाम यांचे कडून दिले) 


प्रमुख उपस्थीत दिपाली टेंभेकर, पं. स. सदस्या व गावातील सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, सम्माननीय क्रिडा प्रेमी विशेषकरून कबड्डी खेळाचे कार्यक्रमात हजर होते.




यावेळी रीतसर पाहुण्यांचे वतीने पाटी टाकून खेळाला सुरवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष एस जी उईके सर, यांनी व्यायाम कसरत करून कोरोणा सारख्या रोगाला पळवून लावा व निर्भय युवा भारत निर्माण करा तसेच खेळात प्रगती साधून ऐक्य निर्माण करून गाव,तालुका, जिल्हा, राज्यात आपले नाव कमवा व स्पर्धात्मक पोलीस, आर्मी यासारख्या नोकर्‍यात स्थान निर्माण करा. असे आवाहन उपस्थीत क्रिडा खेळाडूना केले.

Post a Comment

0 Comments

झाले