आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जलगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगांव ( जिल्हा प्रतिनिधी ):- आज दिनांक 13 फेब्रुवारी 2022 वार रविवार रोजी भुसावळ जि. जळगांव येथे एकलव्य संघटनेची तालुका बैठक संपन्न झाली. रावेर लोकसभा विभागाचे पद नियुक्ती व सत्कार समारंभाचे कार्यक्रम एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आले.
यावेळी एकलव्य संघटना जळगांव रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री.मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच भुसावळ तालुकाध्यक्ष पदी श्री.राजेंद्र वाघ व तालुका उपाध्यक्ष श्री.मनोज बहिरम तालुका सचिव पदी श्री.हेमंत सोनवणे श्री. कृष्णा सोनवणे तालुका सदस्य श्री.अनिल मोरे तालूका सदस्य श्री.संतोष सोनवणे तालुका सदस्य श्री.प्रवीण लोखंडे तालुका सदस्य श्री. धुळकर तालुका सदस्य श्री.यादव सोनवणे तालुका सदस्य यांची निवड करण्यात आली.
या छोट्या खाणी कार्यक्रमाला मुक्ताईनगर रावेर बोदवड जामनेर यावल या ठिकाणाहून प्रमुख कार्यकर्ते व यावल नाका एकलव्य नगर भुसावळ येथील आदिवासी भील समाज बांधव व त्यासोबत जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.संजुबाबा सोनवणे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री. निवृत्ती पवार रावेर लोकसभा उपजिल्हाध्यक्ष श्री. संजय वाघ युवा कार्याध्यक्ष श्री. समाधान जाधव मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.सुरेश मोरे सर जामनेर तालुका अध्यक्ष श्री.विलास मोरे जामनेर मुक्ताईनगर तालुका सचिव श्री. भगवान गायकवाड सर जळगांव शहराध्यक्ष श्री.राहुल ठाकरे जामनेरउपाध्यक्ष श्री. दिपक सोनवणे जामनेर युवा तालुकाध्यक्ष श्री.समाधान सोनवणे जामनेर तालुका सचिव श्री.कृष्णा जाधव मुक्ताईनगर तालुका कोषाध्यक्ष श्री.तुकाराम भिल श्री. पुरुषोत्तम मोरे तालुका कार्याध्यक्ष आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांची प्रदेश कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच एकलव्य संघटनेकडून समाज बांधवांच्या समस्या ऐकून मार्गदर्शन ही करण्यात आले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार