आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
गोंदिया(९ फेब्रुवारी.):- नुकतीच बिरसा फायटर्सच्या वतीने बरबसपुरा दि. ६/२/२०२२ ला तिरोडा येथे बिरसा मुंडा स्मारक अनावरण सोहळा व प्रबोधन मेळाव्या प्रसंगी मा. मिना ताई सोयाम एकोडी यांची बिरसा फायटर्स च्या गोंदिया जिल्हा महिला संरक्षक पदी प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स सुरेशकुमार पंधरे यांनी नुकतीच निवड केली.
यावेळी एस.जी. उईके, जनरल सेक्रेटरी ( विदर्भ ) जिल्हा अध्यक्ष बि. एस. उईके, ता - अध्यक्ष राकेश कुंभरे, मिथुन उईके, मुन्नाजी सलामे जि.सल्लागार, सरपंच नरेश असाटी, प्रकाशजी कोकोडे, तसेच इतर तालुका व जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पञ देवून संमानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार