शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेसाठी लावलेल्या अन्याय कारक अटी रद्द कराव्यात -बिरसा फायटर्स ची मागणी...

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी

शिरपूर (तालुका प्रतिनिधी):- काही दिवसांपुर्वी शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेसाठी काही जाचक नियम लावून अन्याय केलेला आहे त्या जाचक अटी व शर्थी रद्द कराव्यात याबाबत मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, शिरपूर यांना बिरसा फायटर्स या संघटने कडून निवेदन देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, पंतप्रधान आवास योजनाच्या अटी प्रमाणे घरात साधा दूरध्वनी असल्यास लाभार्थी अपात्र ठरविणे, एक महिन्यात प्रत्येक माणूस हा १०००० रु. पेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्यांना व दुचाकी असलेल्या व्यक्तींना लाभ न देणे. तसेच इतर जाचक अटी रद्द करण्यात यावे. कारण सदर अटीमुळे ७०% ते ८०% लाभार्थी हे पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहतील. सदरच्या १३ अटी पैकी ३ अटी या दैनंदिन जिवनात जिवनावश्यक आहेत तरी या अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. 


तसेच या अटी त्वरित रद्द व्हाव्यात यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी व सदर योजनेपासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. हि नम्र विनंती.


यावेळी निवेदन देण्यासाठी बिरसा फायटर्स शिरपूर तालुकाध्यक्ष मा.ईश्वर मोरे, तालुका सचिव मा.गेंदया पावरा व इतर बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले