आदिवासींची संस्कृती, रुढी-परंपरा टिकले पाहीजे -सुरेशकुमार पंधरे

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




नवेगाव(खुर्द) गोंडी संस्कृती पुजा व सुमरणपाठ कार्य व सांस्कृतिक कार्यक्रम बिरसा फायटर्सच्या वतीने संपन्न 


एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ रा.विश्व.पञकार संघ राज्यसदस्य 

तिरोडा २२ ( फेब्रुवारी ) कोया पूनेम धर्म संम्मेलन गोंडी झेंडापूजन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि.२१ पासून गोंडवाणा गोटूल समाज समिती नवेगाव (खुर्द) चे वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रबोधन प्रसंगी सुरेशकुमार पंधरे प्रदेश अध्यक्ष विदर्भ बिरसा फायटर्स, उदघाटक रजनी सोयाम कुभरे जि प सदस्या, कार्य- उपाध्यक्ष एस जी उईके ( मा कृषी अधिकारी तथा महासचिव विदर्भ उपाध्यक्ष, प्रमिला भलावी पं.स स तिरोडा, दिपप्रज्वलक, भोजराज उईके जिल्हाध्यक्ष, ध्वजारोहन मा. मुन्नाजी सलामे सल्लागर, किशोर धुर्वे जिल्हा निरिक्षक, प्रबोधनकार वसंताजी मडावी संपर्क प्रमुख, मा.प्राचार्य.डि बि खंडाते गोंडी भाषाचार्य, सरंक्षक, विनोद उईके महासचिव, सलिराम मरस्कोल्हे  कार्याध्यक्ष. दिलीपकुमार कोडवते सल्लागार, अँड नरेश शेंडे, जितेद्र वल्के, युवाध्यक्ष व प्रतिनिधी बि. फा.शालिकराम परतेकी, दुर्गा नागदेवे सरपंच, दमयंता पटले पोलीस पाटील, बंसीधर पटले  प्रकाश नागदेवे, हे संस्कार पीठावर हजर होते.




दुपारी गावातून गोंडी नॄत्य व वेषभुषेत नाचत गाजत रँर्लीचे समापन सभेत झाले. कोयामानव गंडजिवां कल्याणार्थ मुठवा पहांदी पारीकुपार लिंगोचे पुजन भुमका निलकंठ टेकाम व दिनेश मडावी आदिवासी धर्म प्रचारकांचे वतीने ग्रामअभियान, कलशपूजन सुमरनपाठ करण्यात आले.


यावेळी पुढे संस्कारपीठावर अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे "यांनी गोंडी संस्कॄतीपूजन हे  आदिवासी संस्कॄतीचे आदिम रुढी  परंपरा व अस्तित्वाची जाणीव करून दिली ते चिरकाळ टिकवून ठेवल्यास भाषा आरक्षण वाचेल. यासाठी निसर्गपुजक समाजाने धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्याची साद   (हिंदी) आदिवासी भाषा, आचार विचार, विविधता, पितॄ-मातॄप्रधान सल्लागांगरा शक्ती प्रकृती पूजना चे महत्व अभिन्न अंग असल्याचे  महत्व समजावून सांगितले, नृत्य परंपरा तसेच बोली भाषावरून समाजाचे संमान व ओळख केली जात आहे समाज बांधव शिकाल तर गुलामी च्या निश्चित श्रॄखंला आपोआप तुटतील व पुढे यासाठी कल्याणाच्या योजना आँनलाईन पध्दतीने घेण्यासाठी नियुक्त लोक प्रतिनिधी अभ्यासक व  निष्पक्ष संघटनेचेच  जन निवडून दिल्यास ते समाजाचे चे ऋण फेडतील व संविधानाचे पालन सुध्दा करतील.




धर्म हा आदिवासी जिवनाचा अंग आहे. पॄथ्वीवर अलौकिक विधी नसणारी एकही दुसरी जमात आढळुन येत नाही. आदिवासी समाज निसर्गाच्या सानिध्यात विश्वाच्या पुर्वीपासूनच असल्याने कोरोणा सारखे अदृश्य रोग दुर आहेत. एकीकडे कोविड 19 मुळे देशात पैशावाल्याचे जीवन संपले. यात आदिवासी बांधव अपवाद आहे. आदिवासी जीवन निर्वाहा- च्या दॄष्टीने धर्मकार्य उपयुक्त आहे. समाजात थर्माबद्दल प्रचंड आस्था दिसते. जीवनविषयक व्यवहारात  धार्मिकता पुजापाठ करण्याला मोठे महत्व दिले आहे. म्हणून सन २०२१ जनगणना कॉलममध्ये आदिवासी धर्म लिहावे असे सांगितले.


यात विविध वक्त्यांचे उत्कृष्ठ भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुशाली मळकाम आशा मळकाम, छाया कुंभरे, सुखवंता भलावी, उदेलाल उईके, अंकोश इनवाते, लिला मडावी मेहनत घेतली प्रास्ताविक ममता मळकाम, संचालन नागदेवे सर संदिप मडावी, समारोप किशोर कुंभरेंनी केले.


यावेळी समाजातील विद्यार्थ्यांना गोंडी संस्कृतीचे पुस्तक अध्यक्ष व उदघाटक यांचे वतीने शाल, गुच्छ देत सत्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

झाले