ट्रायबल ऍडव्हायझर कमिटीच्या बैठका न झाल्यामुळे सर्वत्र नाराजी.
राजु प्रधान BTTS अध्यक्ष तळोदा
मुंबई:- अनेक वर्षापासून आदिवासी विकास योजनाबाबत ट्रायबल ऍडव्हायझर कमिटीची बैठक झालेली नाही, यामुळे आदिवासींना योजनांचा योग्य तो लाभ मिळत नाही. नियोजनाअभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून एकही बैठक न झाल्याने भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के टी गावित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षते खाली आमदारांची बैठक होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप बैठक न झाल्यामुळे आदिवासींच्या योजनांवर खर्च होणारा निधी या वर्षीही परत जाणार की काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
जो पर्यंत ट्रायबल ऍडव्हायझर कमिटीची बैठक होत नाही तो पर्यंत आझाद मैदानावर भारतीय ट्रायबल पार्टी व BTTS यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे - के टी गावित
तसेच सोमवारी तळोदा - शाहदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार पाडवी यांनी अकार्यक्षम व खोटे आश्वासन देणाऱ्या आदिवासी मंत्री advocate K C पाडवी यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री कामात व्यस्त असल्यामुळे आंदोलनकर्त्यांना वेळ दिला नाही. मात्र सामाजिक प्रश्नाबाबत आंदोलक आणि आमदार पाडवी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहेत.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार