आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
Eklavya-Sanghatana-Marathwada-Sampark-Abhiyan-Daura
जालना ( जिल्हा प्रतिनिधी ):- दिनांक : १८/०२/२०२२ वार शुक्रवार रोजी एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana ) मराठवाडा संपर्क अभियान दौऱ्याची दुसरी जिल्हा बैठक जालना शासकीय विश्रामगृह येथे एकलव्य संघटना प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब तसेच प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब बर्डे व प्रदेश सचिव मा.श्री.मधुकरराव पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैठकीस जालना जिल्ह्यातून आदिवासी ( Adivasi ) भिल समाज बांधव व एकलव्य संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांना प्रमुख मान्यवरांनी मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब, मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब श्री. शिवाजीराव बर्डे सर यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीला Eklavya Sanghatana मराठवाडा उपाध्यक्ष श्री.नितेश बर्डे, जळगांव जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा श्री.निवृत्ती पवार, जालना जिल्हाध्यक्ष मा.श्री.आत्माराम गायकवाड, मा.श्री. परशूराम सोनवणे, जिल्हा सचिव औरंगाबाद मा.श्री.आत्माराम भाऊ मोरे, संरपच बौधलापुरी मा.श्री.रवि भाऊ बर्डे साहेब पैठण, मा.श्री.तुळसीदास मोरे सर, मा.श्री.राजेश भाऊ बर्डे युवा कार्यक्रर्ते, मा.श्री.किसन आसाराम मोरे, युवक कार्यक्रर्ते मा.श्री.संभाजी बर्डे सर, मा.श्री.मनोज साहेबराव हाटकर, मा.श्री.नवनाथ भाऊ मस्के, मा.श्री.जबिर बर्डे जाफ्राबाद व आदिवासी ( Adivasi ) भिल समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार