✍️एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)
नवेगावबांध : कोरोनाच्या काळात ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी हळुवार गतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात गोंदिया-वडसा-चंद्रपूर-बल्लारशा मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी भाकपच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन 5 एप्रिलपासून चालवण्याचा निर्णय. गाडी क्रमांक 08804/08803 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल, गोंदिया येथून 05 एप्रिल 2022 पासून आणि बल्हारशाह जंक्शन 06 एप्रिल 2022 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावेल.
गाडी क्र. 08804 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदियाहून दररोज 17.05 वाजता सुटेल आणि बल्हारशाह जंक्शनला 23.45 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 08803 बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल बल्हारशाह जंक्शन दररोज 05.15 वाजता सुटेल आणि गोंदियाला 12.00 वाजता पोहोचेल.
या ट्रेनमधील प्रवासादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे लागेल.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार