गणेश भाऊ खर्डे मलगाव, बिरसा फायटर्स कार्याध्यक्ष नंदुरबार विश्वगामी पत्रकार संघ
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील रस्तापूर येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबाना आधीची जमीन तातडीने मिळावी किंवा घरकुले व उपजिवीकेसाठी जमीन तातडीने मिळावी या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 9 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर अन्यायग्रस्त 122 आदिवासी भिल्ल कुटुंबांनी आमरण उपोषण छेडले होते.
सुशिलकुमार पावरा व आंदोलनकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी उपोषणाची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना तात्काळ लेखी पत्र देऊन मागण्याबाबत कार्यवाहीसाठी कळविले आहे. तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पोलीस अधिक्षक अहमदनगर व तहसीलदार भूसूधार शाखा अहमदनगर यांनाही उचित कार्यवाहीसाठी तातडीने पत्र दिले आहे.
सदर लेखी पत्र आंदोलनकांना देऊन उपोषण मागे घेण्यास जिल्हाधिकारी अहमदनगर कडून विनंती करण्यात आली. त्यामुळे लेखी पत्र मिळाल्यामुळे आंदोलनकांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी पोलीस अधिकारी व सुशिलकुमार पावरा, आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र आंदोलनकांच्या आक्रमक रूप पाहून पोलीस अधिकारी यांनी आपली नमती बाजू घेतली व आंदोलकांशी गोड बोलत सहकार्य करायला सुरवात केली.
आमरण उपोषणात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, भिमा साळुंके पुणतांबा अध्यक्ष, मच्छिंद्र रजपूत उपाध्यक्ष, दिपक माळी, विमलबाई रजपूत, रमेश सोनवणे, वसंत जगताप, भास्कर पवार आदिसह 122 आदिवासी कुटुंबांतील महिला- पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी काही समाजसेवी संघटना व समाजसेवकांनी सुद्धा उपोषणाला पाठिंबा देत उपोषणात सहभागी झाले.
जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना तात्काळ लेखी पत्र देत आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यामुळे 100 पैकी 50% लढा यशस्वी झाल्याचे समाधान आंदोलकांनी व्यक्त केले. लेखी पत्रांचा योग्य पाठपुरावा करून लवकरच 100% यश मिळेल, अशी खात्री सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांना लवकरच जमिन मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार