दिड कोटीचा ठेका आणि मुजोर ठेकेदार दिड कोटीचा रस्ता केवळ 40-50 लाखात करायला निघाला.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी      

बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या दोन महानगरांना जोडणारा राज्य महामार्ग 1 शिरपूर तालुक्याच्या आदिवासी भाागातून जातो. त्या रस्त्याची दुरूस्ती सध्या सुरू आहे. ज्यासाठी सरकारने चक्क दिड कोटी रूपयांचा ठेका दिलाय. मात्र मुजोर ठेकेदार सदर काम अत्यंत निकृष्ट करत असून दादागिरीवर उतरलाय. रस्त्याच्या गुणवत्तेवरून विचारले असता त्याचा लेबर असलेला सुपरवाइजर घमेंडीत बोलतो. तर दुसरीकडे ठेकेदार आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशा धमकीवजा बाता करतो.

          

आदिवासी भागातील दिड कोटीचा रस्ता केवळ काही लाखात करण्यासाठी संबंधित भामटे दादागिरी करत आहे. तरी सांगवी, जोयदा, खंबाळे, भिलटपाडा, जामण्यापाडा, आंबा, धवळिविहीर, खामखेडा येथील रहिवाशांनी अशा मुजोर, लुटारू ठेकेदाराला अद्दल घडवण्यासाठी तयार राहा. असे भामटे निकृष्ट काम करून आदिवासिंच्या मृत्युला जबाबदार ठरत आहे. तरी रामा 1 चे निकृष्ट काम तात्काळ थांबवून त्या मुजोर ठेकेदार, सुपरवाइजर, अभियंत्यावर कडक कारवाई होण्यासाठी रस्त्यावर ऊतरूया.

दिड कोटी रस्त्याची लुटमार करू पाहणाऱ्या भामट्या ठेकेदाराला अद्दल घडवुया.

-बिरसा फायटर्स, धुळे जिल्हा (नाशिक विभाग )

Post a Comment

0 Comments

झाले