✍मा. रामेश्वर ढगे, बिरसा क्रांती दल आर्णि तालुकाध्यक्ष
यवतमाळ प्रतिनिधी:- बिरसा क्रांती दलाच्या वतीने मा. तहसीलदार साहेब आर्णि यांना ता. आर्णि जि. यवतमाळ येथील 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार व अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळावी म्हणून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कार्रवाई करण्यात यावी. समाजात दिवसेंदिवस अत्याचारांचे प्रकरणात वाढ झाली असून सदर प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात यावी. जेणेकरून अशा वाईट प्रवृत्तीला आळा बसेल.
सदर आमच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायामुळे समाजात तीव्र प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून, त्या मुलीला त्वरित शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. व आरोपीवर तातडीने कारवाई करून पिडितेस न्याय देण्यात यावा, सदर प्रकरणाची त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बिरसा क्रांती दल व आदिवासी संघटनांकडून देण्यात आला आहे.
यावेळी बिरसा क्रऻति दलाचे आर्णि तालुकाध्यक्ष मा. रामेश्वर ढगे, महासचिव मा. निलेश ऊंकडे, उपअध्यक्ष मा. राजु डकरे, सचिव मा. निलेश बोरकडे, भोजराज दुमारे व आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार