आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. प्रविण पवार सर, अध्यक्ष, आदिवासी भील समाज सेवा बहुद्देशीय संस्था
नामपूर:- बागलाण तालुक्यातील आदिवासी भील समाज सेवा बहुद्देशीय संस्थेमार्फत तालुक्यातील आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून येत्या 11 एप्रिल रोजी शिंदखेडा येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय भील महासंमेलनास तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रविण पवार सर यांनी संमेलनाला जाण्यासाठी नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच तालुक्यातील इतर विषय व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासींसमोर नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांचे डोंगर उभे करण्यात आले आहेत. एकविसाव्या शतकातही आदिवासी बांधव अनेक समस्यांना तोंड देत आहेत. उत्तर महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असुनही समस्या कायम आहेत, याचे कारण आदिवासी समाजात एकता नाही. प्रत्येक गावातील, तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन समस्यांशी लढा दिला तर सर्व समस्यांवर मात करून आपण आपला हक्क व अधिकार मिळवु शकतो व सामाजिक विकास करण्यापासून आपल्याला कोणीही रोखु शकत नाहीत. तसेच आदिवासींनी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन आपले अस्तित्व टिकवले पाहिजे. असे प्रतिपादन मा. प्रविण पवार सरांनी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. कैलास मोरे सरांनी संमेलनाची रूपरेषा व संमेलनातील विषय थोडक्यात समजावून सांगीतले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधवांपर्यंत संमेलनाची माहिती लवकर पोहचवा. असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीस मालेगाव तालुक्यातुन भरत मोरे सर व समाजबांधव तसेच संस्थेचे पदाधिकारी मा. वंकर सोनवणे, बापु वाघ, राजु वाघ, मश्चिंद्र बोरसे, रवींद्र शिंगरे, दत्ता सोनवणे, गणेश पगारे, दिपक निकम, प्रकाश माळी, अनिल ठाकरे, किरण पवार व समाजबांधव उपस्थित होते.



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार