आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, बिरसा क्रांती दल नांदेड ग्रामीण कार्याध्यक्ष
नांदेड जिल्हा प्रतिनीधी:- दि. 16/03/2022 रोजी मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट जि. नांदेड यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना बिरसा क्रांती दल व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा च्या वतीने किनवट येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील जमीन खरेदी-विक्री भ्रष्टाचार बाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, दुय्यम निबंधक कार्यालय किनवट ता. किनवट जि. नांदेड येथील सौ. मस्के व कार्यालयातील रजिस्ट्री मुद्रांक खरेदी-विक्री करणारे कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर सी.आय.डी., एस.आय.टी. मार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणे व शासनाच्या सेवेतून बडतर्फ करुन दंडात्मक कार्यवाही करणे. व त्यांची जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करुन त्या कार्यालयात कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्यात यावेत.
नांदेड जिल्हा ग्रामीण बिरसा क्रांती दल तथा भारतीय जनता पार्टी अनु.जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्ह्यातील आदिवासी सामाजाच्या, पिढीत, शोषीत, वंचित , दारिद्र्य, अल्पभुधारक शेतकरी, भुमिहिन शेतकरी, जेष्ठ, श्रेष्ठ यांची वारंवार तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार समस्त आदिवासी समाजाची मनातील भावना आपणासमोर लेखी स्वरूपात तक्रार देत आहे की, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा आदिवासी बहूल मतदार संघ असून दुय्यम निबंधक मुख्य कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी सौ. मस्के कार्यालयातीन वेळ संपल्यानंतरही तीन चार तास साधारणता रात्री 8 वाजेपर्यंत अनधिकृत शेतीजमिनी, प्लॉटींग चे व्यवहार भरमसाट पैशामध्ये खरेदी विक्रीचे काम जोमात चालू आहे. व त्यांचे सहकारी टिम हे आदिवासी समाजाच्या शेत, जमिन, गायरान, गावठान, 7/12 होल्डींग, कच्चा पक्का कागद घेऊन जमिनी खरेदी विक्री अतिजोमात नांदेड जिल्हयातील व दलाल लोकांकडून भुमाफियांकडून चिरीमिरी पैशाच्या स्वरूपात दुय्यम निबंधक कार्यालयात धंदा दुकान थाटून अनधिकृतपणे अब्जो रूपये जमा करीत आहेत.
या कार्यालयाला तात्काळ सील करून दोषी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन सी.आय.डी., एस.आय.टी. मार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व शासनाच्या सेवेतून बडतर्फ करून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. नाहितर जिल्हााबाहेर यांची हकालपट्टी करण्यात यावी.
सन्माननिय मुख्यमंत्र्यास आग्रहाची विनंती आहे कि, आम्हा आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तात्काळ आदेशपत्र जारी करून त्या दोषी अधिकाऱ्यांवर व शिष्टमंडळावर कठोर कारवाई करून समस्त आदिवासी व शोषीत समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
आदिवासी समाजातील शेतजमिनी कवडीमोल पैशांमध्ये घेऊन दलालांकडून भुमाफियांशी अधिकाऱ्यांशी संगणमत करून आदिवासी समाजातील गरीब लोकांकडून जमीनी घेत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे. यावेळी बिरसा क्रांती दल नांदेड ग्रामीण कार्याध्यक्ष मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, बिरसा क्रांती दल किनवट ता. उपाध्यक्ष मा. सतिष पांडुरंग कनाके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनाची प्रत,

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार