आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
यवतमाळ प्रतिनिधी:- बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार व प्रमुख उपस्थितीत दि. 28/03/2022 रोजी बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा संघटक पदी मा. रामेश्वर ढगे यांची निवड करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण, प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
यवतमाळ येथील विश्राम भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिरसा क्रांती दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथ मडावी साहेब, राज्य अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, राज्य उपाध्यक्ष मा. डॉ.बी.अंबुरे सर, राज्य महासचिव किरण कुंभरे साहेब व जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मा. रामेश्वर ढगे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार