महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनालय प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने बोदलकसा २०२२ पक्षी महोत्सव संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Bodalkasa-2022-Bird-Festival-concludes


पक्षी महोत्सवात प्रसिध्द चित्रकार व फोटोग्राफर लल्ला मुथ्यय्यांनी पत्रकारांना चित्र टिपण्याची कला शिकविली:-

पक्षीमहोत्सवात दंडार, नॄत्य, गोंडी गीतांची रेलचेल,

भंडारा गोंदियाचे पक्षीमिञ निसर्ग लेखकांची हजेरी तर पक्षी पर्यटन निसर्ग सहलीचे आयोजन 


एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ रा विश्वगामी पत्रकार संघ राज्य सदस्य

तिरोडा(१२मार्च) आज गोंडवाणा प्रदेशात शहीद विदर्भवीर बाबुराव शेडमाके १८९ वी जयंती महोत्सव साजरा होत असताना, एकीकडे बोदलकसा पर्यटन स्थली सकाळी कु. पुजा गायकवाड प्रशासक नगर परिषद, सतिश तांदुळकर, सावई, यांचे हस्ते कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.


Bodalkasa-2022-Bird-Festival-concludes


दुपार सत्रात रितसर आम.विजय रहांगडाले, विधान स.क्षेत्र तिरोडा, नयनाजी गुंडे जिल्हा अधिकारी  गोंदिया, प्रसिध्द वाईल्ड फोटो- ग्राफर मुथ्थया, जिल्हा परिषद सदस्य बालुभाऊ बावनथळे, चैतु पटले सरपंच, बोदलकसा अर्चना उईके उपसरपंच, सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स, प्रा डि.बि खंडाते गोंडीभाषाचार्य सर, भोजराज उईके जिल्हा अध्यक्ष बिरसा फायटर्स, गोंदिया वाढे सर, पोलीस अधिकारी, तुमडाम सर कॄषी अधिकाऱी गोंदिया/तिरोडा अधिकारी पदाधिकारी हे यावेळी प्रामुख्याने हजर होते.


Bodalkasa-2022-Bird-Festival-concludes


उद्घाटना प्रसंगी बोदलकसा परिसरातील महिला बचतगट, पत्रकार, लेखक, पक्षीतज्ञ, निसर्गमित्र, साहित्यिअक यांची निसर्ग, मानव व प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी मनुष्यास प्रशिक्षणाची व ते रक्षण व स्वंसंरक्षणाची गरज आहे. व त्यातून  बेरोजगारांना रोजगार पर्यटनातून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष म्हणुन नयना गुंडेनी केले.



Post a Comment

0 Comments

झाले