आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
शहीद वीर बाबुराव शेडमाके १८९ वी जयंती समारोप अरुणा परतेती सरपंच यांच्या हस्ते ध्वजपुजन ग्राम लोणारा येथे संपन्न
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ रा विश्वगामी पत्रकार संघ राज्य सदस्य
तिरोडा-(१२मार्च) देशातील सर्वच आदिवासी संघ विदर्भवीर शहीद बाबुराव शेडमाके यांची १८९ वी जयंती साजरी करतात. याचीच आठवण म्हणून ग्रामीण भागात विदर्भातील सर्व जिल्हा स्तरावर बिरसा फायटर्सच्या वतीने लोणारा येथे सरपंच अरूणा परतेती यांच्या हस्ते ध्वजारोहन व वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिकृतीचे माल्यार्पण करून व विधीवत पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमा चे अध्यक्ष तिरू.शामरावजी उईके महासचिव विदर्भ प्रदेश हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थीतीत मुन्नाजी सलामे जिल्हा सल्लागार, रविंद्र परतेती, सुधीर वाढिवे, अशोकजी सोयाम, रमेशजी उईके, सुरेंद्रजी वल्के, चतुर्भूज उईके, देवदास कुसराम, विश्वनाथ उईके उपस्थित होते.
यावेळी जंगोमवीर बाबूराव अमर रहे चे नारे लावले। वीर शहीद भगवान बिरसा मुंडा अमर रहे ! हम सब एक है । एक तिर एक कमान सभी आदिवासी एक समान असा उलगुलानाचा व एक्याचा नारा बुलंद करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार