ग्रामपंचायत मलोणी येथे सक्षम बिटिया अभियान सर्वेक्षण

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Competent-daughter-campaign-survey-at-Maloni


✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 

गोपाल गावित सर






नंदुरबार दि.१९(प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील मलोनी ग्रामपंचायत मध्ये सक्षम बिटिया अभियान संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन नंदुरबार, पिरामल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सक्षम बिटिया अभियान' जिल्ह्यात राबविले जात आहेत. या अभियान मार्फत किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच वेगवेगळ्या शासकीय योजना विषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाणार आहे. 


Competent-daughter-campaign-survey-at-Maloni


पिरामल फाऊंडेशन चे प्रोग्राम लीडर रमेश जायनाकर यांनी या अभियान संबंधी विस्तारित माहिती सांगितली. त्या वेळेस आशा सेविका, अंगणवाडी सेविका, किशोरवयीन मुली उपस्थित होते. या अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये घरोघरी जाऊन किशोरवयीन मुलींची माहिती घेण्यात आली व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींची वेगवेगळी कारणे आहेत, त्या कारणांचा आज शोध घेण्यात आला. त्याचबरोबर गावकऱ्यांना टीबी विषयी मार्गदर्शन आणि त्यांचे सॅम्पल गोळा करण्यात आले. 


या अभियान साठी जगदीश राजपूत, वंदना सोनवणे, काशिनाथ पाटील, मलोणी ग्रामपंचायत सरपंच मायाबाई कैलास पवार, रोजगार सेवक विक्की वैद्दु, माधवी मोरे, कैलास पवार, गायत्री महिला बचत गट, आशा वर्कर विद्या ठाकरे, अंगणवाडी सेविका प्रतिभा ईशी यांनी सहकार्य केले आहे. 

  • या अभियानांतर्गत शाळाबाह्य, शाळेत नोंदणी केली नाही, 
  • शाळेत नाव नोंदणी आहे पण शाळेत जात नाही, 
  • पुढे शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे, नाव नोंदणी आहे पण शाळेत नियमित जाते, 
  • शाळेत नाव नोंदणी आहे पण शाळेत अनियमित असणाऱ्या किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. 


या अभियानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या शैक्षणिक योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. या अभियानासाठी पिरामल फाऊंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर किशोर घरत, सतीश पवार, आदित्य भोईर, पिरामल स्वास्थ टीम नीलचंद्र शेंडे, साईनाथ अरगडे यांचे सुद्धा मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.



Post a Comment

0 Comments

झाले