आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना
औरंगाबाद प्रतिनिधी:- दिनांक २७/०३/२०२२ वार रविवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री. पवनराजे सोनवणे साहेब यांनी बरकतपूर येथे मयत गणेश भिल यांच्या पिडीत लोखंडे कुटुंब याची सांत्वन भेट घेऊन आरोपी वर कलम ३०२, ५०६ तसेच ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून मयत गणेश भिल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
दिनांक : २४/०३/२०२२ रोजी गणेश लोखंडे ( भिल ) व त्याची पत्नी शेतात ऊस तोडणी करत असतांना ऊस तोडणी वरून टोळी मालक याने गणेश लोखंडे यांना उसाच्या दांडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती त्यात गणेश लोखंडे यांना त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात आणले असता दिनांक : २५/०३/२०२२ रोजी गणेश लोखंडे हे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष यांना मिळाली असता त्यांनी लगेच एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली.
यावेळी सोबत श्री.सुनिल भाऊ ठाकरे एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष औरंगाबाद, श्री.परशुराम सोनवणे जिल्हा सचिव औरंगाबाद, श्री.भिकन भाऊ पवार ता.अध्यक्ष कन्नड, श्री.सुभाष सोनवणे ता. संघटक कन्नड, श्री.तेजराव ठाकरे करंजखेडा सर्कल प्रमुख, श्री.ज्ञानेश्वर भाऊ सोनवणे एकलव्य विद्यार्थी संघटना ता.अध्यक्ष कन्नड व कार्यकर्ते उपस्थित होते.



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार