घोगळपाडा जि.प.शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Education-Council-held-in-ZP-school-with-enthusiasm


✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना

नंदुरबार (प्रतिनिधी )  नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा येथे आयोजित करण्यात आली. सूत्रसंचालन घोगळपाडा शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव सर यांनी केले. डायट नंदुरबार यांच्या प्रेरणेने व नियोजित विषय पत्रिकेनुसार तसेच जुबेर तांबोळी केंद्रप्रमुख भादवड, यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली परिषदेत पुढील विषयावर सविस्तर मार्गदर्शन होऊन परिषद पार पाडली. 


प्रथम केंद्राचे केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी साहेब यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर शिक्षण परिषदेतील विषयास सुरूवात झाली- शिक्षण परिषद माहे-जानेवारी २०२२  मागोवा जुबेर तांबोळी सर केंद्रप्रमुख यांनी या विषयाचे विवेचन करून  शिक्षण परिषद संदर्भात डाएट जिल्हास्तरावरून देण्यात आलेला व्हिडिओ दाखवून जानेवारीची शिक्षण परिषदेची उजळणी घेण्यात आली. 


राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय राबविले जाणारे उपक्रम माहिती आढावा - स्वप्नील पाटील सर यांनी राज्यस्तरीय उपक्रमांची माहिती दिली सदर उपक्रम केंद्रात कशा प्रकारे राबविले जात आहेत याचा आढावा जुबेर तांबोळी सर केंद्रप्रमुख यांनी घेतला. इंग्रजी साहित्य पेटी उजळणी प्रशिक्षण भाग २ सुनील वानखेडे सर यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचे पत्र दिनांक २४/१२/२०२१ अन्वये सदर विषय सोबत दिलेल्या पीपीटी व्हिडिओ द्वारे साहित्य वापराबाबत सादरीकरण करून मार्गदर्शन केले. निपूण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान प्रभावी अंमलबजावणी गोविंद वाडीले सर यांनी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटी चे सादरीकरण करून निपून भारत अंतर्गत विविध कमिट्या व रिसोर्स पूल व अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी समजावून सांगितले. 


मूलनिहाय नियोजन भोलाराम वळवी सर यांनी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटी चे सादरीकरण करून विषय समजावून सांगितला. प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील मुलांचे मूलनिहाय नियोजन कसे करता येईल हे समजावून सांगितले. केंद्रातील शैक्षणिक गरजधारित विषय जुबेर तांबोळी सर केंद्रप्रमुख यांनी जीवन शिक्षण ऑगस्ट २०२१ चा पूर्ण भारत अभियान यावर चर्चा घडवून आणली व मार्गदर्शन केले.

 

प्रशासकीय विषय- विद्यार्थी उपस्थिती, पालक सभा, वर्ग प्रक्रिया नियोजन, शाळा व्यवस्थापन समिती बैठक आढावा, शालेय वर्ग वातावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर चर्चा व मार्गदर्शन केले.


जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व प्राविण्य मिळवलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक उपस्थिती चा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक संजय जाधव शिक्षक अनिल वळवी, निदेश वळवी, रवींद्र कोकणी शिक्षिका कविता पाटील, ललिता वळवी यांनी विशेष मेहनत घेतली. निदेश वळवी सर यांनी केंद्रप्रमुख, सर्व उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार व्यक्त केले आणि शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.



Post a Comment

0 Comments

झाले