एकलव्य संघटना एरंडोल व पारोळा संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )

जळगांव प्रतिनीधी:- दिनांक : १७/०३/२०२२ वार गुरुवार रोजी एकलव्य संघटना एरंडोल व पारोळा येथील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब तसेच प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. 





यावेळी बैठकीचे अध्यक्ष स्थानी मा.श्री.संजुबाबा सोनवणे एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष ( जळगांव लोकसभा ) व प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.रवींद्रभाऊ सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष जळगांव मा.श्री.निवृत्तीभाऊ पवार जळगांव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) हे उपस्थित होते. 




उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री.मा.संजुबाबा सोनवणे मा.श्री.रवींद्रभाऊ सोनवणे मा.श्री.निवृत्तीभाऊ पवार मा.श्री.पिंटूभाऊ सोनवणे यांनी मार्गदर्शन केले व बैठकीत समाज हितासाठी व संघटनेच्या हितासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली एरंडोल व पारोळा तालुक्यात गांव तिथे एकलव्य संघटना तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, विषयावर चर्चा करून संघटनेचा ७.८ महिन्यात महाराष्ट्र भर पसरलेला व्याप या सर्व विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 




याप्रसंगी बैठकीला एकलव्य संघटना अपंग सेल जिल्हाध्यक्ष श्री.ऋषीदादा सोनवणे, जिल्हा संघटक श्री.पिंटूभाऊ सोनवणे, वरिष्ठ जिल्हा मार्गदर्शक श्री. भिवसनबाबा सोनवणे, युवा जिल्हा संघटक श्री.सुभाष मालचे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष ( रावेर लोकसभा ) श्री.समाधान जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष श्री.वाल्मीक सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष श्री.जयभाऊ मोरे, पारोळा तालुकाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, जळगांव तालुकाध्यक्ष श्री.मंगल सोनवणे तसेच सोबत श्री.राहुल सोनवणे, श्री.विनोद मालचे, श्री.सचिन सोनवणे, श्री.समाधान गायकवाड, श्री.लक्ष्मण गायकवाड, श्री.सुनिल सोनवणे, श्री. राजू सोनवणे, श्री.सागर सोनवणे आदी प्रमुख पदाधिकारी व आदिवासी भील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments

झाले