मा. ना. शिवाजीराजे ढवळे साहेब यांच्या हस्ते पारोळा तालुक्यातील पारोळा, टोळी, तरडी, करमाळ या गावी एकलव्य संघटना फलक अनावरण

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Eklavya-Sanghtana-panel-unveiling


✍️मा. किशोर वाघ, एकलव्य संघटना पारोळा तालुका उपाध्यक्ष

पारोळा प्रतिनिधी:- दि.27.03.2022 रोजी. मा. ना. शिवाजीराजे ढवळे साहेब संस्थापक अध्यक्ष एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तथा गृहनिर्माण क्षेत्र सभापती नाशिक (राज्य मंत्री) यांचा खान्देश दौऱ्या निमित्ताने पारोळा तालुक्यातील पारोळा, टोळी, तरडी, करमाळ या गावी एकलव्य संघटना फलक अनावरण करून तामसवाडी या ठिकाणी भव्य असा मेळावा घेण्यात आला. 


Eklavya-Sanghtana-panel-unveiling


यावेळी मा. साहेबांनी पुढील जि.प. निवडणुकी बाबत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. व तामसवाडी या धरणाचे प्रश्न लवकरच पाठपुरावा करून आपल्या समाज बांधवांसाठी मोकळे करीन असे आश्वासन दिले. याप्रसंगी ठिकाणी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Eklavya-Sanghtana-panel-unveiling


तसेच संघटनेचे पदाधिकारी मा. अंकुशराव सोनवणे साहेब प्रदेश उपाध्यक्ष, मा. रजनजी वाघ साहेब प्रदेश संघटक, मा. दिलीप नाना मालचे, मा.बापूसाहेब मोरे जिल्हाध्यक्ष जळगाव, मा. सुनिल पवार युवा जिल्हाध्यक्ष, मा. रविद्र गायकवाड तालुकाध्यक्ष पारोळा, मा.गुलाब बोरसे ता.अमळनेर, मा.किरण बाविस्कर ता. धरणगाव, मा. किशोर वाघ उपाध्यक्ष पारोळा, मा. सिताराम गायकवाड. ता. सचिव, मा. विनोद मोरे ता. कार्याध्यक्ष पारोळा, मा. गोपाल मालचे वि.आ. ता. अध्यक्ष इत्यादी मान्यवर व आदिवासी भील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले