श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिर येथे चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Farewell-ceremony-of-4th-class-students


✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना

नंदुरबार दि.१६ ( प्रतिनिधी ) हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी व प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमहर्षी श्री अण्णासाहेब पि.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गणेश पवार उपस्थित होते. 


Farewell-ceremony-of-4th-class-students


कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच वर्गशिक्षकांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना निरोप समारंभाविषयी माहिती देत  शालेय जीवनातील प्राथमिक शिक्षणातून मिळालेले ज्ञान, संस्कार व शिस्तरुपी शिदोरीचे भावी जीवनातील महत्व पटवून दिले तसेच विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तन्मय जितेंद्र पाडवी, रिया अर्जुन बंजारा, चंद्रदीप देवानंद साळवे, आदित्य दिनेश वळवी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी तसेच वर्गशिक्षकांविषयी ऋण व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा दिला व शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून दिली.


Farewell-ceremony-of-4th-class-students


यावेळी निरोप समारंभा निमित्त शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना केक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक युवराज भामरे व आभार प्रदर्शन श्रीमती नैना सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक सतीश काटके, रेणुका पेंढारकर, रवी चौधरी, शेखर पाटील, चेतन वसईकर, राहुल घुगे यांनी सहकार्य केले.


Farewell-ceremony-of-4th-class-students



Post a Comment

0 Comments

झाले