आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगाव प्रतिनीधी:- दिनांक : १५/०३/२०२२ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावल व मुक्ताईनगर येथील विभागीय प्रांतकार्यालय भुसावळ येथे प्रांताधिकारी यांना एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
एकलव्य संघटनेकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या मागण्या 👇
- १) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाज दफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे.
- २) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्या लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत असून त्यांच्या नाव जागा नाही अश्या लाभार्थ्यांना शासन जिआर नुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावे.
- ३) आदिवासी भिल समाज कसत असलेल्या वन जमीन व गायरान जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर नोंद करून मालकी हक्क मिळावा.
- ४) आदिवासी भिल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावेत.
- ५) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल याची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी.
- ६) शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध आर्थिक योजनांचा लाभ दोन ते तीन महिन्याच्या आतच देण्यात यावा.
- ७) शबरी घरकुल योजनेचा उदिष्ट वाढवून मिळावा
अशा मागण्याबाबत निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना देण्यात आले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार