आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
"झुंड" च्या प्रतिष्ठीत कलाकार शांताताई कुंभरे जिल्हा परिषद सदस्यांसह खनोरा रामटेक येथे लग्न समारंभात
समाजापर्यत गोंडीभाषा पोहोचविण्यासाठी 'झुंड' मध्ये अभिनेत्रीच्या आईची भूमिका स्विकारली -शांताताई कुंभरे
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व पत्रकार संघ भारत
रामटेक: (७ मार्च) नुकतेच नागपूर येथे स्मृर्ती टाॅकिजमध्ये झुंड चित्रपट प्रदर्शित झाला व त्या चित्रपटात जि.प. क्षेञाच्या लोकप्रिय सदस्या शांताताई कुंभरे आहेत. त्यांनी रिंकु राजगुरूच्या आईची भूमिका बजावली आहे. त्यात जेव्हा अमिताभ बच्चन हे यजमान म्हणुन भुमिका बजावतात व घरी येतात तेव्हा मुलीची आई व तिचा माणुस गोंडी सुसंवाद आपल्या भाषेत साधतात हा आदिवासींच्या परंपराचा उत्तम उदाहरण आहे. त्यातून आपली ओळख, अस्तित्व दिसून येते तेच जगाला दाखविण्याचे कार्य आपण करित आहात असे मार्मिक उद्गार खनोरा गावी लग्न्न समारंभात 'झुंड' च्या अभिनेत्री शांताताई कुंभरेसह चर्चा करतांनी सुरेशकुमार पंधरे यांनी केले.
यावेळी सगाजन, रायभान कोकोडे करवाही, गोंडीभाषाचार्य देवेंद्र बी.खंडाते, वर्षा खंडाते, गट प्रवर्तक खनोरा, यावेळी कुभरेताईं नी गोंडीभाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्यसभा खासदार उईके ताई (एमपी ) चा उल्लेख करित आईची भूमिका स्विकार करून आपण आदिवासी भाषेला साता समुद्रापार नेणार असल्याचे व गर्वाने गोंडी भाषा सर्व भाषांची जननी आहे असे म्हटले.
'झुंड' व "नाळ" चिञपटातून आदिवासी जीवनमान कसे आहे त्याची समिश्रा करणे शक्य होणार असे भरपुर एकमेकासह चर्चा झाल्या व यावर आमच्या प्रतिनिधीनी सदर वॄताचा प्रत्यक्ष हवाला दिला. आज हे मी प्रत्यक्ष त्या भगिनींचा स्वागत व सुसंवादाने साहित्यिक भाषेत शब्द सुमनाने सत्कार केला त्या स्वता बिरसा फायटर्सच्या सदस्या आहात हे जाणीव करून दिले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार