आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ, रा.वि.पत्रकार संघ भारत
नागपूर जिल्हा प्रतिनिधी:- दि. १२/०३/२०२२ रोली गोंडराजे, क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची जयंती निमित्त जंगोम रैली द्वारे नागपूर जिल्ह्यातील शहर व गावातील गोंडी धर्माचा सप्तरंगी ध्वज व पेन ठाणा येथे गोंड समुदायांना गोंडराजे व गोंडी संस्कृती बद्दल मार्गदर्शन मोहीम राबविण्यात आली.
जय गोंडवाणा बहु. व क्रिडा मंडळ, नागपूर (बिरसा फायटर्स संघटन) / गोंडवाना गणतंत्र पार्टी / गोंडवाणा युथ फोर्स / गोंडवाना महासभा / गोंडवाणा सोडूम यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दि. १२/०३/२०२२ रोजी सन १८५७ च्या जल-जंगल-जमीन व गोंडी संस्कृतिच्या रक्षणाकरीता इंग्रजांविरुध्द लढा देणारे स्वातंत्र लढ्यातील गोंडराजे, क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची जयंती निमित्त गोंडराजे यांचा इतिहास व गोंडी संस्कृती मार्गदर्शन करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील,
- १) राणी दुर्गावती नगर, नागपूर,
- २) डिप्टी सिग्नल, नागपूर,
- ३) भांडेवाडी, नागपूर,
- ४) पावनगांव (भिमाल पेन ठाणा), ता. कामठी, जि. नागपूर,
- ५) उमरी, ता. कामठी, जि. नागपूर,
- ६) आसलवाडा, ता. कामठी, जि. नागपूर,
- ७) चापेगडी (खेरोदाई ठाणा),, ता. कुही, जि. नागपूर,
- ८) आगरगांव (भिमालपेन ठाणा), ता. कुही, जि. नागपूर,
- ९) भिवकुंड (भिमाल पेन ठाणा), ता. कुही, जि. नागपूर
- १०) पांडेगांव, ता. कुही, जि. नागपूर येथे संपन्न.
गोंड समुदायातील सगाजनांनी शहरी व ग्रामीणांना गोंडराजे व गोंडी संस्कृती बद्दल गोंड समुदायांना मार्गदर्शनात सांगितले की, गोंडवाणा साम्राज्याचे २५८ रियासत व ५२ गढ चे इ.स. १४ व्या शतकातील गोंडराजा संग्रामशाह मडावी यांचा योगदान गोंड समुदाय व इतर समाजांकरीता मोलाचे होते. गोंडराजे, क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेळमाके यांचा जन्म मोल्लंपल्ली (अहेरी) येथील शेडमाके कुटुंबातील राजघराण्यात १२ मार्च, १८३३ मध्ये झाला. इंग्रज व इतरांकडून गोंड समुदायांच्या जल-जंगल-जमीनीवर अतिक्रमण व गोंडी संस्कृतीवर आप-आपले धर्म थोपविण्यात येत असतांनी गोंडराजे यांनी गोंड समुदायाला (१ ते १२ सगा) एकत्रित आणून दि. २४ सप्टेंबर, १९५७ रोजी जंगोम सेना (दल) ची स्थापना केली. दलाद्वारे त्यांनी इंग्रजांविरुध्द लढा दिला. शेवटी त्यांना इंग्रजांकडून २१ ऑक्टोंबर, १८५८ रोजी वयाच्या २५ व्या वर्षी फासी ची शिक्षा देण्यात आली व ते शहीद झाले, तसेच साथीदारांना १४ वर्षाचा तुरुंगवास झाला.
अश्याचप्रकारे गोंडवाणातील विविध गोंडराजे, क्रांतीवीर व विरांगणाये यांचा ईतिहास युवा पिढीपासून का लपविण्यात येत आहे ? असा प्रश्न देशातील व राज्यातील शासन-प्रशासनावर उभा होत आहे ! त्याचप्रमाणे, भारतीय राज्यघटना व मा.सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाप्रमाणे गोंड समुदायांची संस्कृती नुसार ते कोणत्याच धर्मात मोडत नसून त्यांची स्वत: ची स्वतंत्र संस्कृती आहे.
सदर कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मुठवा (भुमक) तिरु. नितेश आत्राम, तिरुमाय मंगलाताई उईके, तिरुमल रवी पेंदाम, तिरु. प्रशांत पंधरे, तिरु. प्रल्हाद कुंभरे, तिरु. नंदकिशोर शेडमाके, तिरु. सत्यावान कोवे, तिरु. त्रिवेश कुमरे व स्थानिय सहयोगी १) तिरु. रोहित ईलपाची, २) तिरु. राजकुमार कुंजाम, ३) तिरु. सचिन आत्राम, ४) तिरु. राहुल उईके, ५) तिरु. पवन सयाम, ६) तिरु. आशिष धुर्वे, ७) तिरु. जितु उईके, ८) तिरु. महादेव आत्राम, ९) तिरु. चंद्रभान पंधरे, १०) तिरु. खुशाल तिडगाम, यांसह मातृशक्ती-पितृशक्ती प्रामुख्याने उपस्थित होते.
शेवटी पेन ठाणा मध्ये ज्योत लावून जय सेवा-सेवा जोहार-जय गोंडवाना व गोंडराजे यांचा आवाहन करुन, गोंड समुदायांना गोंडी संस्कृती व गोंडवाणा साम्राज्यातील गोंडराजे, विरांगणाये यांचा ईतिहासाबद्दल गोंड समुदाय जागृती करण्यात आले.
तिरु. प्रशांत उदारामजी पंधरे
अध्यक्ष
नागपूर जयगोंडवाना बहु.व क्रिडा मंडळ, नागपूर (म.रा.)
अधिक फोटो 👇👇👇👇

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार