आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जामनेर:- दिनांक ११/०३/२०२२ वार शुक्रवार रोजी एकलव्य संघटनेची जामनेर तालुका आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली संघटनेच्या तालुका आढावा बैठकीला जामनेर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थित होती. एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांची धावती भेट दिली असता आजच्या ह्या आढावा बैठकीचे आयोजन तालुका कमिटीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली होती.
बैठकीत जामनेर तालुक्यात संघटनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व संघटनेचे समाजप्रबोधन कार्यक्रम तसेच समाजावर वेळवेळी होणारे अन्याय अत्याचार व शासनाच्या विविध शासकीय योजनेची माहिती ह्या संदर्भात आजच्या बैठकीचे विषय मांडण्यात आले
ह्या वेळी बैठकीला एकलव्य संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष ( जळगांव लोकसभा ) श्री.संजुबाबा सोनवणे, एकलव्य संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) श्री.निवृत्ती पवार, एकलव्य संघटना युवा जिल्हा कार्याध्यक्ष रावेर लोकसभा श्री.समाधान जाधव, एकलव्य संघटना जामनेर तालुकाध्यक्ष श्री.विलास मोरे तालुका उपाध्यक्ष श्री.दीपक सोनवणे तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी श्री. समाधान सोनवणे, श्री.सोपान मोरे, श्री.भानुदास गायकवाड, श्री.शेवाळे सर, श्री.सुक्राम मोरे, श्री.मनसाराम मोरे, श्री.गोविंदा मोरे, श्री.अशोक मोरे, श्री.भगवान मोरे आदी प्रमुख पदाधिकारी ह्या वेळी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार