महिला दिनानिमित्त फुलवडे ता.आंबेगाव येथे "खेळ रंगला पैठणीचा !" कार्यक्रम संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Khel-Rangala-Paithanicha!-At-Phulwade-Event-Done


     ✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872  

आंबेगाव ( प्रतिनिधी ) फुलवडे (ता.आंबेगाव) येथील लयभारी महिला ग्रुप व धनश्री महिला बचत गट मोहरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनानिमित्त 'खेळ रंगला पैठणीचा' हा अनोखा कार्यक्रम प्रथमच ग्रामीण भागात घेण्यात आला. त्यामुळे चूल आणि मुल सांभाळत संसाराचा गाडा रेटणाऱ्या महिलांना चांगलाच विरंगुळा मिळाला .

            

महिलांसाठी संगीत खुर्ची, तळ्यातमळ्यात, बास्केटबॉल, प्रश्नमंजूषा असे मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले. त्याचप्रमाणे उखाणेस्पर्धा, नृत्यस्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. खेळामधे ६० महिलांनी सहभाग घेतला. यामधे शैला अनिल मोहरे विजेत्या ठरल्या तर कुसुम गौरव गभाले या उपविजेत्या ठरल्या. लयभारी महिला ग्रुपच्या अध्यक्षा राजश्री मोहरे व सहयाद्री आदिवासी नोकरदार मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर किसन मोहरे यांच्या हस्ते बक्षीरसांचे वाटप करण्यात आले.

         

Khel-Rangala-Paithanicha!-At-Phulwade-Event-Done


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलवडे गावच्या सरपंचा सौ. मनिषा नंदकर, सेवानिवृत्त जवान नारायण हिले, कल्पना हिले, नामदेव मोहरे, भिमाबाई भारमळ, व पंचक्रोशीतील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी गावातील कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



Post a Comment

0 Comments

झाले