आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
नंदुरबार दि.९ खोंडामळी केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच होळ तर्फे हवेली शाळेवर घेण्यात आली यावेळी नुकतेच नूतन गटशिक्षणाधिकारी मा. जयवंत चौरे साहेब यांचा केंद्रातर्फे केंद्रप्रमुख संजय कुवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच खोंडामळी बीटाचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी डी. जी. वसावे साहेब व बामडोद शाळेचे मुख्याध्यापक तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ श्री हंसराज पाटील आणि कानळदे शाळेचे उपशिक्षक श्री प्रकाश बोरसे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तरी केंद्रातर्फे त्यांना भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आष्टे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.एस एन पाटील साहेब यांचा सत्कार बापू ठाकरे सरांनी केला. सुंदरदे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. सचिन गोसावी साहेब यांचा सत्कार शशिकांत पाटील यांनी केला केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कुवर यांचा सत्कार शैलेंद्र पाडवी शिक्षण परिषद समन्वयक ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार निर्मला काळे व मनोज पाटील यांचा सत्कार कमल पावरा यांनी केला.
यावेळी केंद्रातील शिक्षक / शिक्षिका कविता पाटील, शशिकांत पाटील, उज्वला पाटील, सुधीर बोरसे, सरला पाटील, अनिल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख अतिथी एस. एन. पाटील साहेब सचिन गोसावी साहेब संजय कुवर यांनी सेवापुर्ती बाबत मनोगत अनुभव सांगून शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गटशिक्षणाधिकारी मा. जयवंत चौरे साहेब यांनी शैक्षणिक मार्गदर्शना सोबत सेवानिवृत्तांना शुभेच्छा देऊन उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे जावो अशी प्रभू चरणी प्रार्थना करून या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानावरुन सेवानिवृत्तांना शुभेच्छा देण्याचे भाग्य लाभले व माझे स्वागत केले याबद्दल केंद्राचे आभार व्यक्त केले.
शिक्षण परिषदेचे दुसरे सत्र जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या नियोजनानूसार शिक्षण परिषदेचे दुसरे सत्र घेण्यात आले त्यात. प्रथम केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कुवर यांनी जानेवारी महिन्याच्या मागोवा सादर करून व्हिडीओ दाखवून उजळणी घेतली इंग्रजी साहित्य पेटी बाबत दि.२४/१२/२०१९ विषयानुसार पीपीटी दाखवून वापराबाबत श्रीमती मिनल लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. निपून भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अंमलबजावणीबाबत सुधीर बोरसे यांनी पीपीटी द्वारे विविध साहित्य वरील अर्थपूर्ण बाबत समजावून सांगितले. मुल निहाय नियोजन अमोल पाटील यांनी सखोल मार्गदर्शन करून नियोजन कसे करता येईल ते सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंदराव करनकाळ तर प्रास्ताविक श्रीमती मिनल लोखंडे यांनी व आभार प्रदर्शन बापू ठाकरे यांनी केले.
ऑगस्ट २०२१ जीवन शिक्षण बाबत रंजना गावीत यांनी चर्चा घडवून आणली तसेच उपस्थित वर्ग प्रक्रिया नियोजन शाळा व्यवस्थापन समिती बैठक आढावा वर्ग वातावरण मनपूर्वक उपक्रम यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कुवर यांनी केले शिक्षण परिषद स्वागत समारोप त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे नियोजन केंद्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी करून यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार