जंगल कामगार सभागृह तिरोडा येथे संघटन मजबुतीसाठी बिरसा फायटर्सची सभा संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Meeting-of-Birsa-Fighters-held-to-strengthen-the-organization


एस.के.जी. पंधरे, विदर्भ ब्युरो चिफ 

महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

तिरोडा प्रतिनीधी:- (२० मार्च) तिरोडा येथे आदिवासी जंगल सभागृह कार्यालय येथे आदिवासी सर्वच संघटना पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी  सभेच्या अध्यक्षस्थानी शामराव जी उईके (मा.कॄषी प्रमुख अधिकारी) महासचिव, विदर्भ प्रमुख राकेश सोयाम, महानिरिक्षक उपस्थितीत एस उईके जिल्हाध्यक्ष गोंदिया मुन्नाजी सलामे जिल्हा सल्लागार, जगनजी धुर्वे जिल्हा संघ जंगल अध्यक्ष, दुर्गेश कळपते, उपाध्यक्ष जंगल कामगार, (संरक्षक बिरसा फायटर्स) वसंतजी मडावी संपर्क प्रमुख, कमलप्रसाद गेडाम, दिलीपकुमार कोडवते ता. सल्लागार, राजेश्वर उईके, उपाध्यक्ष, जंगल कामगार संजय मडावी सर (संरक्षक) वडेगांव, चांगोजी तिलगामे, खुमेंद्र उईके, बोदलकसा, जितेंद्रकुमार वल्के तालुका युवा उपप्रतिनिधी, राजमोहन उईके, कोडेलोहारा, विनोदजी उईके ता.महासचिव, इत्यादी पदाधिकारी व जिल्हा जंगल संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी जयपाल मुंडांच्या छायाचित्राचे पुजन करण्यात आले. संघटन मजबुती व समाजाच्या विविध आत्याचार, समस्यांना वाचा फोडण्यासाठी संवाद करण्यात आले. बिरसी विमाणतळाला गोंडवाणा नाव देण्यात यावे, बिरसी विमानतळास गोंडवाणा नाव द्यावे असा प्रस्ताव पास करण्यात आला. मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना देणे, आदिवासीसाठी एकात्मिक प्रकल्प देवरीतर्फे आपातग्रस्त कुटुंबांना ५०,००० रू मदत मिळवून देणे, न्युक्लीअस बजेटंतर्गत सुशिक्षीत बेरोजगार यांना ५०,००० रू कर्ज योजना राबवणे, जिल्हा परिषद अंतर्गत १०,००० रू.सहाय्यता निधी जिल्हा योजना) पंचायत विभागाकडून राबविणे, देवरी व भंडारा ऑफिस कडून दोन्ही जिल्हा करिता योजना सुरू आहे अर्ज प्रत्येक तालुक्यातील वस्तीगृह अधिक्षकाकडून भरणे आणि घरकूल प्रस्ताव ग्राम पंचायत ठराव करून संबंधीत विभागाला देणे व योजनेचा लाभ समाजा पर्यंत पोहचविणे इत्यादी विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात आले. 


बिरसा फायटर्स चे आद्य कर्तव्य. संघटन वाढीसाठी समाजसेवेचे व्रतधारी खरे संघटनेचे पदाधिकारी असू शकतात, ॲक्टीव्ह सभासद तयार करणे व काम न करणारे निष्क्रिय सभासद कमी करावे असे ठरले पूढील सभा दि.०३/०४/२२ ला घेण्याचे ठरले. सभेची प्रस्तावना भोजराज उईके, संचालन संजय मडावी सर तर आभार राकेश सोयाम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

झाले