आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल
पुणे:- २१ वर्षे ०१ महिना १२ दिवस देशाच्या सीमेवरती ड्युटी केल्यानंतर दिनांक २८/०२/२०२२ रोजी फुलवडे (हिलेवाडी) ता आंबेगाव जि पुणे गावाचे सुपुत्र BSF जवान नारायण बबन हिले हे सेवानिवृत्त झाले.
श्री औदुबरेश्वाराचे दैवत लाभलेले एका बाजुला डिभे धरणाचे जलाशय आणि बाकी सर्वबाजूने सह्याद्रीच्या रागांमध्ये वसलेल्या फुलवडे (हिलेवाडी) गावातील पवित्र भुमीत दिनांक ०४/१०/१९७७ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोहरेवाडी, माध्यमिक शिक्षण श्रीरंग वि. गभाले. विद्यालय मोहरेवाडी, ज्युनियर कॉलेज श्री. टि. एस. दादा बो॑राडे विद्यालय शिनोली. आणि सिनियर कॉलेज आण्णा साहेब आवटे कॉलेज मंचर येथे शिक्षण घेत असताना दिनांक १६/०१/२००१ मधे दोघे भाऊ नारायण बबन हिले आणि संतोष बबन हिले सीमा सुरक्षा दल मधे भरती झाले ११ महिने कठिण ट्रेनिंग S T C बैकंढपुर पंश्चिम बंगाल येथे पुर्ण केल्यानंतर पहिली पोस्टींग जम्मु काश्मिर सुंदरबनी येथे १६२ बटालियन मधी झाली.
२००१ मधे संसदभवन वरती हल्ला झाल्यानंतर भारत-पाक सीमेवर युद्धाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वातावरणात सलग तीन वर्षे L O C लाईन ऑफ कंट्रोलवर ड्युटी केली, त्यानंतर दुसरी पोस्टींग पंजाब बॉर्डर वर, तिसरी पोस्टींग परत जम्मु कश्मीर C I Base उधमपुर येथे, चौथी पोस्टींग तुरा बॉर्डर मेघालय, पांचवी पोस्टींग लुगलेई मिझोराम येथे, साहावी पोस्टींग केरळ तिरसुर येथे रिझर्व बटालियन म्हणुन त्यानंतर सातवी पोस्टींग हि १६२ बटालियन मधुन १८० बटालियन मधी पंश्चिम बंगाल या ठिकाणी इंटरनेशनल बॉर्डरवरती झाली.
याचबरोबर २००५ मध्य हरियाणा बिहार इलेक्शन ड्युटी पण केली आहे आणि त्यानंतर २०१८ ते २०२० मध्य STC हजारीबाग झारखण्ड, FTR HQ बैंग्लोर कर्नाटक मध्य ड्युटी केली. अशी एकुण २१ वर्षे ०१ महिना १२ दिवस देशाच्या सीमेवरती ड्युटी केल्यानंतर दिनांक २८/०२/२०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.
दिनांक ०३/०३/२०२२ रोजी स्वागतासाठी सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळ फुलवडे यांचे पदाधिकारी पुणे रेल्वे स्टेशन येथे जंगी स्वागत केले आणि दिनांक 05/03/2022 रोजी सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळ व लय भारी महिला ग्रुप फुलवडे यांचे वतीने भव्य स्वागत समारंभाचा आयोजन केलेला आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार