राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचा एल्गार, पंचायत समिति प्रशासन थंडगार

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Rashtriy adiwasi Ekta Parishad


✍️रणजीत तडवी जळगाव

पाचोरा ( प्रतिनिधी ):- पाचोरा पंचायत समिति कार्यालय पाचोरा येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गफूर तडवी यांच्या नेतृत्वाखाली मा.रणजीत तडवी तसेच adv. रोहित ब्राम्हणे (ILA जळगाव जिल्हाध्यक्ष) यांनी अक्षरशः तालुका पंचायत प्रशासन धारेवर धरून ठेवले. संबंधित आणि जबाबदार प्रशासनास जाब विचारण्यास भाग पाडले.


विषय ही तेवढाच गंभीर, प्रश्न ही अगदी हातावर पोट असणाऱ्या गरीब तसेच वंचित-पीड़ित- बेघर-निराधार आदिवासी समाजाचा. पिंपळगाव ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या काही गावातील 1300 ते 1400 पात्र आणि मंजूर घरकुल अंतर्गत येणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांचा. घरकुल प्रकरण अगदी मंजूर...लाभ प्राप्त म्हणून अगदी संबंधित अधिकारीकृत सहीनिशि रजिस्ट्री नोंद देखील केलेली पण मात्र घडविलेला प्रशासनाने उपक्रम मात्र उलट-खेदजनक. म्हणजे आदिवासी समुदायाच्या हिताला दाखविलेली केराची टोपली.ह्या विरोधात आदिवासी समाजसह इतर वर्गातिल लोकांनी देखील हिरीरिने सहभाग नोंदउन आपला निषेध व्यक्त केला. 


पंचायत समिति कार्यालयात प्रचंड जनसंख्येने लोक उपस्थित होते. प्रशासनाला ह्या प्रकरण अंतर्गत खाते निहाय सखोल चौकशी होऊन संबंधित-जबाबदार अधिकारी-कर्मचारी यांच्या वर कठोर कायदेशीर कारवाई करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळउन द्यावा ह्यसाठी चे निवेदन दिले गेले. निवेदन हे मा.,रणजीत तडवी, Adv. मा.रोहित ब्राम्हणे, दादासाहेब सुनील शिंदे पाटिल राष्ट्रीय पिछड़ा (ओबीसी) वर्ग मोर्चा जिलाध्यक्ष सह राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी सह,बहुजन मुक्ति पार्टी, बहुजन क्रांति मोर्चा, ILA, सह इतर संघटन चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्तीत होते.


यासाठी  Adv.मा.रोहित ब्राम्हणे, मा.सुनील शिंदे पाटिल, मा.रणजीत तडवी, मा.जाकिर तडवी यांचे विशेष अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments

झाले