धारू पोटे गुरुजींचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


 

Sahastra-Chandra-Darshan-ceremony-held


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो- 9307691872

पुणे:- बोरघर येथील आवळेवाडीचे रहीवासी व पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. धारू मांवजी पोटे यांचा दि. 6 मार्च 2022 रोजी आवळेवाडी येथे ह.भ.प गंगाराम महाराज बांबळे यांच्या संकल्पनेतून 'सहस्रचंद्रदर्शन' सोहळा पार पडला. कार्यक्रमामध्ये लेकी-सुना, मुलांकडून व नातवंडांकडून माता-पित्यांचे मंत्रोच्चाराने पाद्यपूजन करण्यात आले. 101 दिव्यांच्या तबकाने औक्षण करण्यात आले. 


सर्वच उपस्थितांचा फेटा, शाल, श्रीफळ, हरिपाठाचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. शंकर पोटे व ह.भ.प संतोष पोटे यांनी सन्मान केला. उपस्थितांमध्ये मा. गणपत दादा कोकणे, शरद सह.बँक, मा. डी.बी. घोडे, उपायुक्त, मा. संजय शेळके, कृ.उ.बा. समिती, सौ.सीताबाई बांबळे, सरपंच बोरघर, मा.तहसीलदार शिवाजी तळपे, कवी व लेखक मनोहर मोहरे, सर्व माजी विद्यार्थी तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील पुणे, मुंबई व कोल्हापूर व स्थानिक मान्यवर यांनी आपली मनोगतं व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. 


या कार्यक्रमास काळभैरवनाथ ग्राम विकास संघाचे अध्यक्ष राजू वालकोळी इतर पदाधिकारी व सभासद तसेच ऊंबरवाडी येथील पुणे मुंबई व आवळेवाडी-जायवाडी ग्रामस्थ, आप्तेष्ट नातेवाईक व पंचक्रोशीतील पाहुणे यांनी गुरुजींचा वैयक्तिक व सामूहिक सन्मान करून शुभेच्छा दिल्या. 


सायंकाळी हरिपाठ व त्या नंतर भागवताचार्य ह.भ.प. श्री प्रशांत महाराज पाटील, धुळे यांची किर्तन सेवा झाली व तद्नतर रात्री हरि जागर कार्यक्रमाने सांगता झाली. मातृ-पितृ पूजनाच्या या अनोख्या सोहळ्याच्या निमित्ताने श्री. पोटे गुरुजी यांच्या मुलांनी आई-वडीलांच्या कार्य-कर्तृत्वाचा केलेला गौरव समाजासाठी एक आदर्शवत असा अविस्मरणीय सोहळा ठरला आहे. सूत्रसंचलन विजय जंगले यांनी केले व आभार शंकर पोटे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments

झाले