साक्री जि. धुळे येथे "भील परिवार" संकल्पना राबविण्याबाबत वेगवेगळ्या संघटनांची बैठक संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Sakri-Dist.-The-concept-of-Bhil-Parivar-at-Dhule


साक्री प्रतिनीधी:- शेवाळी फाटा ता. साक्री जि. धुळे येथे भील परिवार ही संकल्पना राबविण्याबाबत साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांची दिनांक 20/03/2022 रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विविध संघटनांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये काम करणारे समाजातील कट्टर कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले.


राजकीय / सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना या आदिवासी भिल समाजातील तरुणांच्या समर्पित भावनेतून उभे राहिलेले असल्या तरी त्यांचा दबावगट निर्माण होत नसल्यामुळे भील समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. तसेच भिलेतर आदिवासी समाजाचे राजकीय प्रतिनिधी हे भील समाजाचा फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापर करीत असल्याबद्दल भील समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.


त्याचप्रमाणे समाजातील जनप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते जे आपल्याच समाजाची दिशाभूल करून प्रस्तापित व्यवस्थेला मदत करीत असल्यामुळेच आज समाजाची स्थिती अतिशय दयनीय झाली असल्याने त्या बाबत  सुद्धा समाजातील तरुणांनी आणि समाजाच्या परिस्थितीवर गंभीरतेने चिंतन करणाऱ्यांनी सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यकर्त्यांनी केले. 


सदर बैठकीमध्ये भिल समाज हा सर्व आदिवासी समाजाचे मूळ असून भिल समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक व्यक्तीने आपली राजकीय भूमिका आपले संघटनात्मक विचारसरणी व इतर बाबी या बाजूला ठेवून एका ठिकाणी येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यकर्त्यांनी केले. रक्ताचे नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी भिल समाजाला संघटित ठेवण्यासाठी भविष्यात कुठलाही राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिवेश बाजूला ठेवून आपल्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार याचा जाब विचारण्यासाठी सर्व भील समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपला दबाव गट निर्माण करावा यासाठी भील समाजातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. भविष्यात यासाठी कार्यकर्त्यांचे प्रबोधन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना हुशार करणे, समाजाच्या समस्यांबाबत बारकाईने निरीक्षण करणे व त्या सोडवण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.


यावेळी बैठकीसाठी आप.धनेश ठाकरे, आप. रवींद्र मालुसरे, आप शिवदास सोनवणे, आप. लखन पवार आप. नंदू भिल, आप.चंदू भील, आप.डोंगर मालचे, चद्रकांत अहिरे, बापू साई, अनिल साने, नंदू माळचे, विठ्ठल पगारे, संजय भिल, भास्कर भील, संतोष सोनवणे, मनोहर भील, सुनील बागले, सुनील सोनवणे, सतीलाल ठाकरे, विनोद मोरे, सोमनाथ मालचे तसेच शेवाळी, निजामपुर, दिघावे, नेर, सटाणा , खामलोन, कासरे, आष्टने साक्रीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भील समाजातील मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले