आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
मालेगाव (तालुका प्रतिनिधी):- मालेगाव संगमेश्वर येथील प्रज्ञा सूर्य बौद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची सभा आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर.राष्ट्रीय सल्लागार. आद.बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष. आद.भीमराव आंबेडकर. नाशिक पूर्व शाखा जिल्हाध्यक्ष मा. गौरव दादा पवार गुरूजी यांच्या अध्यक्षतेत व त्यांच्या मार्गदर्शना मध्ये मालेगाव शहर शाखेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
मा. सतिष गांगुर्डे गुरुजी जिल्हा सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव शहर शाखेच्या सरचिटणीस पदी मा. सतिष बाबुलाल मगरे, अध्यक्षपदी मा. आनंद मैराळे गुरूजी, उपाध्यक्ष मा. मंगेश निकम, कोषाध्यक्ष मा. वाल्मिक देवरे गुरूजी, संरक्षण उपाध्यक्ष मा. दादाजी वाघ, महिला उपाध्यक्ष सौ. नलिनी ताई गायकवाड, संघटक मा. सुभाष पटाईत यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांकडून सर्व नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व उपासक उपासिका 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार