साकोली येथे राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार - 22 चे वितरण

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


State-Level-Nature-Friend-Award at-Sakoli


✍️एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ, महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ

साकोली:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत वतीने, इंजि. घनश्याम शिवचरण निखाडे प्राचार्य वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली, डॉ. जितेंद्रजी अखीलेश्र्वर ठाकूर शारीरिक निदेशक राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी, मा. खेमराज प्रेमलाल राऊत प्राचार्य ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय साकोली यांना राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार - 22 चे  श्री. मा. रमेशजी कुंभारे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी साकोली यांच्या हस्ते तहसील कार्यालय साकोली येथे सन्मानपूर्वक दिनांक 14 मार्च 2022 ला प्रदान करण्यात आला. 


State-Level-Nature-Friend-Award at-Sakoli


प्रसंगी श्रीमती अनिता गावंडे नायब तहसीलदार साकोली, श्री. अनिलजी किरणापुरे पंचायत समिती सदस्य साकोली,  मा.श्री यशवंत उपरीकर उपाध्यक्ष नागपुर विभाग प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रसंगी इंजि. घनश्याम निखाडे यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पोलीस भरती पूर्व परीक्षार्थींना प्रश्नसंच वाटप, जन्मदिनी भेट वस्तू म्हनून वृक्ष देऊन साजरा करणे, स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण, प्रजासत्ताक दिनी गड किल्ल्यावर जाऊन तिथे स्वच्छता अभियान राबवने व वृक्षारोपण करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संतुलनासाठी अथक परिश्रम घेत आहोत व पुढेही करत राहू, व आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर, महाराष्ट्र अध्यक्ष बादल बेले यांचे आभार मानतो असे सत्कारा प्रसंगी सांगितले. 


कार्यक्रमाचे आयोजक मा.श्री यशवंत उपरीकर उपाध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास नागपूर विभाग, अनिता खोटोले, प्रा. गुलाबराव चौधरी, वनिता बहेकार, प्रीती डोंगरवार, पूजा कपगते, जयश्री भानारकर, वंदना नंदेस्वर, उर्मिला निंबेकर, जया भुरे, वर्षा तरजुले, कल्पना सांगोडे, संगीता खूणे व इतर पदाधिकारी यांनी केले.



Post a Comment

0 Comments

झाले