आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगांव ( प्रतिनिधी ) दिनांक : ०८/०३/२०२२ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटनेच्या वतीने भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले दिनांक : ०५/०३/२०२२ रोजी कृष्णानगर भुसावळ येथे एकलव्यची प्रतिमा असलेले ध्वज काही समाज कंटक लोकांनी जाळून व तसेच मंदिरात स्थापन केलेल्या भगवान एकलव्यची मूर्ती तेथून चोरून त्या मूर्तीची विलेवाट करून आदिवासी भील समाजाचे सामाजिक भावना दुखावल्याची घटना भुसावळ येथील कृष्णानगर येथे घडली.
घडलेल्या घटनेची माहिती एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष जळगांव ( रावेर लोकसभा ) श्री. निवृत्ती पवार व उपजिल्हाध्यक्ष जळगांव ( रावेर लोकसभा ) श्री. संजय वाघ यांना मिळाल्यावर त्यांनी झालेल्या घटनेची शहानिशा करण्यासाठी एकलव्य संघटना भुसावळ तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र वाघ यांच्याशी संपर्क साधून केली व झालेली घटना ही सत्य आहे याची माहिती घेऊन घटनास्थळी धाव घेऊन पुन्हा चौकशी करण्यात आली व त्या नंतर तिथे उपस्थित सर्व समाज बांधव व एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन गाठले व झालेल्या घटनेची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक श्री. राहूल गायकवाड साहेब यांना दिली.
तसेच एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आरोपींवर कलम 295 (अ) नुकसान गुन्हा दाखल करण्यात आले ह्या वेळी एकलव्य संघटना युवा कार्याध्यक्ष श्री.समाधान जाधव, जामनेर तालुका उपाध्यक्ष श्री. दिपक सोनवणे, सौ. आशाताई ठाकरे, श्री. अजय मोरे, श्री. सुभाष सोनवणे, श्री. सुनिल मोरे, श्री. विजय मोरे, सौ. वत्सलाबाई गायकवाड, श्री.कृष्णा सोनवणे, श्री. कृष्णा मोरे, श्री.मनोज बहिरम, श्री.राजू पवार, श्री. सुनिल धुळेकर व सोबत भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार