पुणे प्रतिनिधी:- तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथील ७ वर्षीच्या चिमुकलीवर बलात्कार व अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री यांना बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव मा चिंधू आढळ यांनी ईमेल द्वारे निवेदन पाठवून कठोर कारवाई साठी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी. समाजात दिवसेंदिवस अत्याचारांचे प्रकरणात वाढ झाली असून सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी. जेणेकरून समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्तीला आळा बसेल. सदर आमच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायामुळे समाजात तीव्र प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून, त्या मुलीला त्वरीत शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. व आरोपीवर तातडीने कारवाई करुन पिडीतेस न्याय देण्यात यावा.
सदर प्रकरणाची त्वरीत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बिरसा क्रांती दल व इतर आदिवासी संघटनांकडून देण्यात आला आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार